Vijay Wadettiwar on Soybean: सोयाबीनमध्ये सरसकट लूट सुरुय; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

0
Vijay Wadettiwar on Soybean: सोयाबीनमध्ये सरसकट लूट सुरुय; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
Vijay Wadettiwar on Soybean: सोयाबीनमध्ये सरसकट लूट सुरुय; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

नगर : सोयाबीनमध्ये (Soybeans) सरसकट लूट सुरु आहे. मोठ्या प्रमाणात उद्योगपती भरभरून सोयाबीन भारतात आणत आहेत. जर आता सोयाबीन खरेदी झालं नाही तर महिन्यात सोयाबीन हजारावर येईल लिहून ठेवा, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिला. वडेट्टीवार यांनी हमीभावाचा मुद्दा उपस्थित करत कोणत्या खरेदी केंद्रावर सोयाबीन ५ हजार ३०० रुपयांनी खरेदी केलाय,आम्हाला दाखवून द्या,असं आव्हान यावेळी सरकारला दिले आहे.

नक्की वाचा: अक्षय खन्नाच्या धुरंधर मधील ‘त्या’ व्हायरल गाण्यामागचा किस्सा नेमका काय ? 

‘७० टक्के सोयाबीन परत केला जातोय’  (Vijay Wadettiwar on Soybean)

विजय वडेट्टीवार म्हणाले की, यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन अनेक ठिकाणी पूर्णतः खराब झालं आहे. काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली. त्यांनी सभागृहात सांगितले की, ७० टक्के सोयाबीन परत केला जात आहे. म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावाने खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे अशी विचारण त्यांनी केली. आयातीवर लावलेल्या कराबद्दलही त्यांनी प्रश्न विचारला. ते म्हणाले की, आयातीवर शून्य टक्के आयात कर केला आहे. १२ टक्क्यावरून तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करणार ? अशीही विचारणा त्यांनी केली.

अवश्य वाचा: बाळाचे जीवन संपवून आई-वडिलांनी घेतले देवदर्शन;नेमकं प्रकरण काय ?