नगर : थोरातांचे मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) पत्र म्हणजे फक्त राजकारण (politics) असून साईबाबांच्या नगरीत राजकारण करू नका, असा सल्ला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना दिला आहे.
साई भक्तांसाठी उभारलेली दर्शनरांग तातडीने खुली करा, उद्घाटनाला पंतप्रधानांची वेळ मिळाली नाही, तर भक्तांची वर्षानुवर्ष गैरसोय होऊ देणार का? असा सवाल उपस्थित करुन काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केला. त्यावर मंत्री विखे पाटील यांनी प्रतिउत्तर देताना म्हणाले, ”थोरातांच्या तालुक्यात अन्य प्रश्न आहेत. त्यांच्या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मला सोडवावा लागला. स्वतःच्या अपयशापासून लोकांचे लक्ष इतरत्र नेण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. शिर्डीतील दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्र्यांना विनंती केली आहे. उद्घाटन नाही म्हणून भाविकांची गैरसोय झालेली नाही. उद्घाटनाची तारीख मिळावी यासाठी पुन्हा प्रधानमंत्र्यांना विनंती करणार आहाेत. तारीख लवकर मिळाली नाही, तर आधी दर्शन रांग सुरू करू आणि लोकार्पण नंतर करू,” असेही विखे पाटील यांनी म्हटलं आहे.