Vikhe-Jagtap Friendship : नगर : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप (Vikhe-Jagtap Friendship) यांनी मोठा विजय खेचून आणला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानीपत झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (NCP Sharad Pawar) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (Maharashtra Navnirman Sena) भोपळाही फोडता आला नाही. भाजप-राष्ट्रवादी युतीने ६८ पैकी ५२ जागा जिंकत सहज सत्ता मिळवली.
अहिल्यानगर शहराच्या नामांतरानंतरची ही पहिली निवडणूक होती. ही निवडणूक खासदार निलेश लंके विरुद्ध माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील अशी रंगली होती. अखेर विखे पाटलांनी लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत लंकेंना आसमान दाखवले. तर आमदार जगताप यांनी विरोधकांना नामशेष केले.
महायुती फिसकटली अन्
या निवडणुकीत महायुती होईल अशी चर्चा शेवटपर्यंत रंगली. मात्र, शेवटच्या क्षणी महायुतीतून जागा वाटपाच्या वादातून नाराज झालेला शिवसेनेचा शिंदे गट बाहेर पडला. शिंदे गटाने स्वतंत्र निवडणूक लढवली. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटामधील इच्छुकांना जास्त जागा लढवता आल्या. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. महाविकास आघाडीला सक्षम उमेदवारांसाठी मोठी शोधाशोध करावी लागली. त्यामुळे महाविकास आघाडी एकसंघ असूनही त्यांना लढत देता आली नाही. शेवटच्या क्षणी मनसे व शिवसेना ठाकरे गटाचेही बिनसले. त्याचा फायदा युतीच्या उमेदवारांनी घेतला.
नक्की वाचा: महामार्गाच्या कामाचे ग्रहण दूर व्हावे यासाठी राहू केतूच्या मंदिरात अभिषेक
शिवसेनेच्या दोन्ही गटाला फटका(Vikhe-Jagtap Friendship)
१९९०नंतर अहिल्यानगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने २४ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेच्या विभाजनानंतरची ही पहिलीच महापालिका निवडणूक होती. शिवसेना दोन गटात विभागली गेली. माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन झाल्यावर शिवसेना नगरसेवक विखुरले. ठाकरे गटाकडे योगीराज गाडेंच्या रुपाने केवळ एकच नगरसेवक उरला होता. गाडेंनी या निवडणुकीत विजय मिळवत ठाकरे गटाची लाज राखली. शिंदे गटाला १० जागा जिंकण्यातच यश आले. या लढाईत शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे व सचिन जाधव पराभूत झाले. सचिन जाधव यांच्या पत्नीचाही पराभव झाला. मात्र, प्रभाग १२ मध्ये शिंदे गटाने लाज राखली.
अवश्य वाचा : महाराष्ट्रातील 2 हजार 869 जागांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक जागा महायुतीच्या झोळीत
बोराटे यांचा नवव्यांदा विजय (Vikhe-Jagtap Friendship)
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनी या निवडणुकीत विजय संपादन केला. बोराटे हे सलग नऊ वेळा नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत.सर्वाधिक 9 वेळा विजयी होणारे बोराटे हे एकमेव नगसेवक आहेत.
अनिल शिंदे, दीप चव्हाण, नज्जू पैलवान, यांचा पराभव
कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांचा प्रभाग क्रमांक 9 मधून पराभव झाला आहे. तसेच अनेक वर्षे नगरसेवक राहिलेले नज्जू पैलवान यांचा प्रभाग क्रमांक 12 मध्ये पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांचा प्रभाग क्रमांक 15 मध्ये पराभव झाला. अनिल शिंदे यांच्या पत्नी शीला शिंदे यांनी महापौरपद भूषविले होते. शिंदे यांचा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांचे चिरंजीव सुजय मोहिते यांनी पराभव केला. या तिघांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे.
एमआयएमची एंट्री
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएमने आपले खाते उघडून पहिल्यांदाच महापालिकेमध्ये त्यांचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे एक प्रकारे एमआयएमची महापालिकेत एंट्री झाली आहे. एमआयएमकडून शेख शहेनाज खालीद आणि सय्यद शहाजाब अहमद हे विजयी झाले.
फेरमोजणीमध्ये गेनप्पा, शेख विजयी
प्रभाग क्रमांक 11 ब आणि प्रभाग क्रमांक 4 ड या जागेवर फेरमतमोजणी झाली. यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये एमआयएमचे समद खान आणि शम्स शेख (कॉंग्रेस) यांच्यात फेरमतमोजणी झाली. याठिकाणी शम्स शेख (कॉंग्रेस) यांना विजयी घोषित करण्यात आले. तर प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये भाजपाच्या दिप्ती गांधी व शिवसेनेच्या सुनिता गेनप्पा यांच्यात फेरमतमोजणी झाली. यामध्ये सुनिता गेनप्पा यांना विजयी घोषित करण्यात आले.
केडगावमध्ये कोतकरांना धक्का
केडगावमधील प्रभाग 16 आणि 17 मध्ये भाजपा-राष्ट्रवादी युती आणि शिवसेना तसेच माजी सभापती भानुदास कोतकर समर्थक अपक्ष उमेदवार अशी लढत झाली. केडगावमधील या दोन्ही प्रभागात भाजपा- राष्ट्रवादी युतीने विजय मिळविला. या निवडणुकीत शिवसेनेसह कोतकर समर्थकांचा पराभव झाला. कोतकर यांना आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात अपयश आले आहे. कोतकरांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
माजी महापौरांच्या कुुटुंबियांचा संमिश्र निकाल
माजी महापौरांच्या कुटुंबीयांचा संमिश्र निकाल लागला आहे. माजी महापौर शीला शिंदे यांचे पती अनिल शिंदे पराभूत झाले. माजी महापौर रोहिणी शेंडगे यांचे पती संजय शेंडगे हे विजयी झाले. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी सुनिता फुलसौंदर विजयी झाल्या आहेत.
विजयी उमेदवार
वॉर्ड १
अ)
सागर बोरुडे (राष्ट्रवादी अ.प.)
ब)
शारदा ढवण (भाजप)
क)
दीपाली बारस्कर (राष्ट्रवादी अ.प.)
ड)
संपत बारस्कर (राष्ट्रवादी अ.प.)
प्रभाग-दोन
अ
रोशनी भोसले – भाजप
ब
महेश तवले – (राष्ट्रवादी अ.प.)
क
संध्या पवार – (राष्ट्रवादी अ.प.)
ड
निखील वारे – (भाजप)
प्रभाग-तीन
अ
योगिराज गाडे – शिवसेना (ठाकरे गट)
ब
ज्योती गाडे – (राष्ट्रवादी अ.प.)
क
सोही गुरुशिलकौर संतपालसिंग – (राष्ट्रवादी अ.प.)
ड
ऋग्वेद गंधे – भाजप
वॉर्ड ४
अ
शेख शेहनाज खालिद – AIMIM
ब
सय्यद शाहबाज अहमद
(AIMIM)
क
मिनाज खान – काँग्रेस
ड
शम्स खान – काँग्रेस
प्रभाग – पाच
अ
काजल भोसले – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
ब
धनंजय जाधव – भाजप
क
गंभीर हरप्रीतकौर – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
ड
मोहित पंजाबी – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
प्रभाग-6
अ
मनोज दुलम – भाजप
ब
सोनाबाई शिंदे – भाजप – बिनविरोध
क
सुनीता कुलकर्णी – भाजप
ड
करण कराळे – भाजप – बिनविरोध
वॉर्ड ७
अ
वर्षा सानप – भाजप
ब
पुष्पा बोरुडे – भाजप – बिनविरोध
क
वंदना ताठे – भाजप
ड
बाबासाहेब वाकळे – भाजप
वॉर्ड ८
अ
सुनीता भिंगारदिवे – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
ब
आशाबाई कातोरे – भाजप
क
नवनाथ कातोरे – शिवसेना शिंदे गट
ड)
कुमार वाकळे – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.) – बिनविरोध
प्रभाग-9
अ
शेंडगे संजय-शिवसेना
ब
रुपाली दातरंगे – शिवसेना
क
वैशाली नळकांडे – शिवसेना
ड
महेश लोंढे – भाजप
प्रभाग-10
अ
श्रीपाद छिंदम – बसप
ब
शीतल ढोणे – भाजप
क
मयुरी जाधव – भाजप
ड
सागर मुर्तडकर-भाजप
वॉर्ड ११
अ
उमेश कवडे – शिवसेना
ब
सुनीता गेनाप्पा – शिवसेना
क
आशा डागवाले (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
ड
सुभाष लोंढे – भाजप
वॉर्ड १२
अ
मंगल लोखंडे – शिवसेना शिंदे गट
ब
सुरेखा कदम – शिवसेना शिंदे गट
क
चंद्रशेखर बोराटे – शिवसेना शिंदे गट
ड
दत्तात्रय कावरे – शिवसेना शिंदे गट
प्रभाग-13
अ
सुरेश बनसोडे – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
ब
सुजाता पडोळे – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
क
अनिता शेटिया – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
ड
अविनाश घुले – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
प्रभाग-14
अ
प्रकाश भागानगरे – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.) – बिनविरोध
ब
सुनीता फुलसौंदर – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
क
मीना चोपडा – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
ड
गणेश भोसले – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
वॉर्ड १५
अ
पौर्णिमा गव्हाळे – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
ब
दत्तात्रय गाडळकर – भाजप
क
गीतांजली काळे – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
ड
सुजय मोहिते – भाजप
वॉर्ड १६
अ
सुनीता कांबळे – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
ब
वर्षा काकडे – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
क
विजय पठारे – भाजप
ड
ज्ञानेश्वर येवले – भाजप
वॉर्ड १७
अ
मयूर बांगरे – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
ब
अश्विनी लोंढे – (राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.)
क
कमल कोतकर – भाजप
ड
मनोज कोतकर – भाजप
पक्षीय बलाबल
एकूण जागा- 68
भाजप – 25
राष्ट्रवादी- 27
शिवसेना- 10
शिवसेना (उबाठा) – 1
काँग्रेस- 2
मनसे- 0
राष्ट्रवादी (श.प.) – 0
बसप – 3
MIM – 2



