नगर : भारतीय मनोरंजन विषयातून एक दुःखद बातमी समोर आली आहे.राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि रंगभूषाकार विक्रम गायकवाड (Vikram Gaikwad) यांचं मुंबईत निधन (Passes Away) झाल आहे. विक्रम गायकवाड यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. मुंबईच्या (Mumbai) पवईमधील हिरानंदानी इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
नक्की वाचा : ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच;एका घटस्फोटाची गोष्ट मोठ्या पडद्यावर उलगडणार
विक्रम गायकवाड हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. कोरोनामध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर ते आजारीच होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांची तब्येत अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना पवईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज (ता.१०) सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गायकवाड हे ६१ वर्षाचे होते. त्यांच्यावर दादरमधील शिवाजी पार्क इथं आज संध्याकाळी ५ वाजता त्यांच्यावर अत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्यात पत्नी ज्योत्स्ना गायकवाड आणि मुलगी तन्वी गायकवाड आहे.
अवश्य वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’ वर सिनेमे बनवण्यासाठी बॉलिवूडमध्ये लागली स्पर्धा;’या’ निर्मात्यांनी केलं रजिस्ट्रेशन
कलाकारांकडून शोक व्यक्त (Vikram Gaikwad)
काशिनाथ घाणेकर,बालगंधर्व, ठग्ज ऑफ हिंदुस्तान, शहीद भगतसिंगपासून जाणता राजापर्यंत वैविध्यपूर्ण पात्रांना आपल्या रंगभूषेने अधिक वास्तववादी करणाऱ्या प्रसिद्ध रंगभूषा संकल्पक विक्रम गायकवाड यांच्या निधनाने सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. तसेच सिनेसृष्टीला हा मोठा धक्का बसला असल्याची भावना कलाकारांकडून व्यक्त केली जात आहे.
विक्रम गायकवाड राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित (Vikram Gaikwad)
विक्रम गायकवाड हे प्रसिद्ध रंगभूषाकार आणि अभिनेते होते. पानिपत, बेल बॉटम ,उरी, डर्टी ब्लॅकमेल, दंगल, पीके, झांशी, सुपर३०, केदारनाथ अशा अनेक सिनेमात त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून उत्तम जबाबदारी त्यांनी निभावली आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी प्रसिद्ध रंगभूषाकार म्हणून जबाबदारी पार पडली होती. पावनखिंड,फत्ते शिकस्त, शेर शिवराज अशा ऐतिहासिक मालिकांमध्ये देखील त्यांनी रंगभूषाकार म्हणून उत्तम जबाबदारी निभावली होती. त्यांना सात वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. दंगल,संजू, थ्री इडियट्स, भाग मिल्खा भाग,पानिपत अशा शेकडो सिनेमांचे मेकअप डिझायनर ते होते. तर २०१३ साली बंगाली सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने ही गौरविण्यात आलं होतं.