
Vikram Pachpute : श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील रखडलेल्या आरोग्य सुविधांबाबत आमदार विक्रम पाचपुते (Vikram Pachpute) यांनी अधिवेशनात (Convention) आक्रमक भूमिका मांडली. तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्चून इमारती तयार असतानाही केवळ पदनिर्मितीअभावी त्या धूळ खात पडल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला. श्रीगोंदा शहरात प्रस्तावित असलेल्या १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा (Sub-District Hospital) विषय मांडत उपजिल्हा रुग्णालयासाठी महसूल विभागाने पाच एकर जमीन आरोग्य विभागाकडे वर्ग केली आहे, मात्र गेल्या तीन वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे.
नक्की वाचा : पाथर्डीत उद्या हिंदू संमेलन
रुग्णालयाची इमारत वर्षभरापूर्वीच पूर्ण
कोळगाव येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सुमारे १६ कोटी रुपये खर्चून ३० बेडचे भव्य ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाची इमारत वर्षभरापूर्वीच पूर्ण झाली आहे, मात्र आवश्यक पदनिर्मिती अद्याप न झाल्यामुळे हे रुग्णालय कार्यान्वित होऊ शकले नाही, याकडे पाचपुते यांनी शासनाचे लक्ष वेधले. याच सोबत देवदैठण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत देखील दीड वर्षापासून तयार आहे. तेथे कर्मचारी नसल्याने ती बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
लवकरच पदभरतीची जाहिरात काढणार (Vikram Pachpute)
आमदार पाचपुते यांच्या प्रश्नावर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पदभरतीची प्रक्रिया गतीने पूर्ण करतानाच राज्यस्तरीय पदभरतीची जाहिरात लवकरच काढणार असल्याचे सांगितले. राज्यात लोकसंख्या आणि दोन केंद्रांमधील अंतर लक्षात घेऊन सुमारे २००० नवीन उपकेंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. पदभरती प्रक्रिया पूर्ण होताच कोळगाव आणि देवदैठण येथील केंद्रे सुरू होतील, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला. यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.


