Vinesh Phogat:”आई कुस्ती जिंकली, मी हरलेय”…ऑलिम्पिकच्या धक्क्यानंतर विनेश फोगटचा कुस्तीला रामराम 

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने प्राणाहून प्रिय असलेल्या कुस्तीला अलविदा केला आहे. विनेशने तिच्या सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

0
Vinesh Phogat
Vinesh Phogat

Vinesh Phogat Retirement : “आई, कुस्ती जिंकली, मी हरलेय, माफ कर मला, तुझे स्वप्न, माझं धैर्य, सगळं काही संपलंय, यापेक्षा जास्त ताकद आता माझ्यात राहिलेली नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४ तुम्ही सर्व सदैव माझ्यासोबत असाल, मी ऋणी राहीन”,असं म्हणत भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) प्राणाहून प्रिय असलेल्या कुस्तीला अलविदा (Retirement from wrestling) केला आहे. कुस्तीपटू विनेश फोगटने तिच्या एक सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

नक्की वाचा : भारताला मोठा धक्का!विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र  

पॅरिस ऑलिंपिकच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या विनेश फोगटला १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आलं आहे.त्यामुळे तिचं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. त्यानंतर निराश झालेल्या विनेशने कुस्तीला रामराम केला आहे. मंगळवारी (ता.६) विनेशनं महिलांच्या ५० किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात क्युबाच्या युस्नेलिस लोपेझ गझमनवर मात केली होती. मात्र, बुधवारी (ता.७) सकाळी विनेशचं वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आलं आहे.

अवश्य वाचा : रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी!लाडकी बहीण योजनेचा हप्ता’या’दिवशी मिळणार

विनेश फोगटच्या बाबतीत ‘नेमकं काय घडलं ?(Vinesh Phogat)


विनेश फोगटकडे साऱ्या भारताचं लक्ष होतं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचली. पण वजनाच्या नियमात न बसल्याने विनेश अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली आणि सुवर्ण पदक मिळवण्याचं तिचे स्वप्न भंगलं. महिलांच्या फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये विनेश ५० किलो वजनी गटात खेळत होती. बुधवारी सकाळी फायनल पूर्वी वजन मोजल्यानंतर अधिकाऱ्यांना तिचं वजन प्रमाणित मर्यादेपेक्षा जास्त आढळले.भारतीय पथकाने हे काही ग्रॅम वजन घटवण्यासाठी थोडा अवधी मागितला. मात्र वजन घटवता न आल्याने विनेश फोगटला अपात्र घोषित करण्यात आलं.

विनेशची कुस्तीतील कारकीर्द ? (Vinesh Phogat )

२०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत विनेश फोगटने तिचे पहिले मोठे आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकले.यावेळी तिने सुवर्णपदक जिंकून आपल्या कारकिर्दीची दिमाखात सुरुवात केली. त्यानंतर तिने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली, पण त्यादरम्यान तिला पदक मिळवण्यात अपयश आले. २०१८ मध्ये विनेशने कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. २०२१ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिचे पहिले सुवर्णपदक जिंकल्यानंतर ती टोकियो ऑलिम्पिकचा भाग राहिली. त्यानंतर २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले होते. पॅरिस ऑलम्पिकमध्ये तिला सुवर्ण जिंकण्याची संधी होती. मात्र तिची ही संधी हुकली आहे. त्यासोबतच कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचाही चुराडा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here