Virabhadra Maharaj Yatra : राहाता : शहरातील विरभद्र महाराज यात्रा (Virabhadra Maharaj Yatra) ही केवळ धार्मिक परंपरा नसून, ती शतकानुशतके जपलेली लोकसंस्कृतीची (Folk Culture) जिवंत ओळख आहे. अनेक वर्षांपासून अखंडित सुरू असलेली ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी होत आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण गळवंती (Galavanti) (बगाड) या परंपरेची उर्जा आणि भक्ती आजही अबाधित आहे.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेला फसवणुकीचे ग्रहण; ३८ शेतकऱ्यांना साडेपाच लाखांचा गंडा

नारळ फोडून यात्रेची सुरुवात
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हसोबा मंदिरात नारळ फोडून यात्रेची सुरुवात होते. हनुमान जयंतीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात गावातील प्रत्येक समाजातील नागरिक सहभागी होतात. २ एप्रिल नवनाथ महाराज यात्रा व ३ एप्रिलला विरभद्र महाराज यात्रा होणार आहे. सर्व नागरिकांनी या यात्रा उत्सवात सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी. असे ट्रस्टचे अध्यक्ष जाबाजी मेचे यांनी सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गळी लागण्याची परंपरा हि यंदा कायम (Virabhadra Maharaj Yatra)
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजेगळवंती लागणे हे आहे नवसपूर्तीच्या अनुषंगाने वीरभद्र महाराजांच्या यात्रेत गळी लागण्याची परंपरा हि यंदा कायम असून दरवर्षी हजारो महिला व पुरुष गळी लागतात. कोरोना संकटामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा गळवंतीचा तोच थरार अनुभवायला मिळणार असल्याने, राहात्याच्या या प्रसिद्ध यात्रेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या यात्रेला राज्यभरातून भक्त येत असतात. मंदिरासमोर शेरणीचा (गुळ) प्रसाद व पेढे वाटून अनेक भावीक नवसपूर्ती करतात यात्रा सुरू होण्यापूर्वी शहरांमध्ये आठ दिवस आधी पासून ट्रस्टी व गावातील मंडळींना मिष्टान्न भोजन देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे.
पारंपरिक तंत्राने हा रथ उभारला जातो
यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे विरभद्र व नवनाथ देवांच्या मंदिरासमोर मंदिराचे पुजारी सर्जेराव भगत यांचे येणाऱ्या वर्षाचे होइक(भाकित) ऐकण्यासाठी नागरिक उत्सुकतेने वाट पाहत असतात. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे गळवंती रथ. विशेष म्हणजे हा रथ पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने तयार केला जातो. लोखंडाचा वापर न करता सागवान व रामकाठी लाकडापासून, केवळ दोर व पारंपरिक तंत्राने हा रथ उभारला जातो. सुमारे २४ फूट उंचीचा हा रथ गावातील कारागिरी, कौशल्य आणि परंपरेचा उत्कृष्ट नमुना आहे. गळवंती मिरवणुकीदरम्यान डफांच्या गजरात, मानाच्या काठ्यांसह रथ शहरभर फिरतो. भाविक भक्त या गळवंतीला गळी लागून नवस व्यक्त करतात ही केवळ धार्मिक कृती नसून, श्रद्धेचा एक भावनिक संवाद असतो.
या प्रवासात संपूर्ण गाव सहभागी
हनुमान जयंतीच्या दिवशी गळवंती प्रथम नवनाथ महाराज मंदिरात येते, तर दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला राजा विरभद्र महाराज मंदिरात प्रस्थान करते. या प्रवासात संपूर्ण गाव सहभागी होतो या यात्रेत विविध समाजघटकांना मानाचे स्थान दिले जाते. रथ बनविण्याची परंपरा गाडेकर कुटुंबाकडे, तर गळवंती खेचण्याचा मान पारंपरिक समाज घटकांकडे असतो. ही परंपरा सामाजिक ऐक्य आणि परस्पर सन्मानाचे जिवंत उदाहरण आहे.



