Viral events of 2025:२०२५ मधील व्हायरल घटना कोणत्या? जाणून घ्या सविस्तर… 

0
Viral events of 2025: २०२५ मधील व्हायरल घटना कोणत्या ? जाणून घ्या सविस्तर... 
Viral events of 2025: २०२५ मधील व्हायरल घटना कोणत्या ? जाणून घ्या सविस्तर... 

Viral events of 2025 :सोशल मीडियावर (Social Media) अनेक नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात. जसा ट्रेंड असेल तश्या गोष्टी बदलतात. तसेच काही गोष्टी सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. मग त्यात मोठी घटना असो किंवा एखाद्याच वैक्तिक आयुष्य, चला तर मग पाहुयात… २०२५ मध्ये सगळ्यात जास्त व्हायरल (Viral events of 2025) झालेल्या घटना कोणत्या आहेत…

नक्की वाचा: भारताकडून K-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी;२ टन अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता    

१. मोनालिसा :
 


२०२५ च्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमधील प्रयागराज मध्ये महाकुंभच आयोजन करण्यात आले होते. इथे आलेय अनेकांची चर्चा झाली मात्र महाकुंभात हार विकणारी मोनालिसा मात्र सर्वाधिक भाव खाऊन गेली. एका युट्यूबरच्या कॅमेऱ्याने तिचा साधेपणा आणि सुंदर डोळे टिपले. आणि तिचा तो व्हिडिओ रातोरात व्हायरल झाला.आता तिने बॉलिवूडमध्येही प्रवेश केला आहे.

२. ‘छावा’ चित्रपटाचा प्रभाव:

 फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटातील काही महत्त्वाच्या दृश्यांचे आणि त्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड झाले. या चित्रपटाने सिनेसृष्टीत नवा इतिहास रचला.

३. स्वारगेट रेप केस :

स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये २६वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरण हे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलं. यामुळे पुन्हा एकदा पुण्याची बदनामी झाली. या प्रकरणातील सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडेला पोलिसांनी अटक केली आहे.

४. पहलगाम हल्ला :

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. तसेच याच  हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवत  पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ९ तळ उद्धवस्त करत एअर स्ट्राईक केला.

५.महाराष्ट्रातील महापुराचे भीषण वास्तव

२०२५ च्या सप्टेंबर महिन्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात (बीड, अहिल्यानगर, सोलापूर) झालेल्या तुफान पावसामुळे भीषण पुराचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. ड्रोनने टिपलेले पाण्याखालील गाव आणि वाहून जाणारी जनावरे पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

अवश्य वाचा:  कमी वयात गाजवलं क्रिकेटचं मैदान;वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने गौरव  

६. रोहित शर्माचा व विराट कोहलीचा कसोटीला रामराम:

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून ७ मेला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली तर विराट कोहलीने देखील १२ मेला अचानक कसोटी क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

७.  आरसीबी ट्रॉफी :

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने अहमदाबाद येथे ४ जूनला झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करून आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावले आणि तब्बल १८ वर्षांचा दुष्काळ संपवला. या विजेमुळे क्रिकेटपटू विराट कोहलीचं स्वप्न साकार झालं.

८.  सक्षम हत्या प्रकरण :

नांदेडमधील सक्षम ताठे  हत्या प्रकरण चर्चेचा विषय ठरले. जातीय वादातून मुलीच्या घरच्यांनी तिच्या प्रियकराला म्हणजेच सक्षमला निर्घृणपणे संपवले होते. यावेळी त्याची प्रेयसी आंचल मामीलवाड हिने एक अनपेक्षित कृती केली.सक्षमचा अंत्यविधीपूर्वी तिने त्याच्या मृतदेहापाशीच त्याच्या नावाची हळद आणि कुंकू स्वतःला लावले. २७ नोव्हेंबरला ही घटना घडली. तिने मृतदेहाशी केलेलं लग्न हे चर्चेचा विषय ठरलं.

९. महिला संघाने विश्वचषकावर कोरलं नाव:
 
भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषक विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात संघाने  2 नोव्हेंबर रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या एका रोमहर्षक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून ही ट्रॉफी जिंकली.

१० स्मृती मानधना :

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं २३ नोव्हेंबरला लग्न होणार होतं. या लग्न सोहळ्यात संगीत आणि हळदीचा कार्यक्रम देखील पार पडला. मात्र ऐन लग्नाच्या दिवशी त्यांचं लग्न रद्द झालं. त्यानंतर पलाश मुच्छलचे काही चॅट्स व्हायरल झाल्याने तो स्मृतीला चिट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. आणि दोघांनीही हे लग्न तुटलं असं जाहीर केलं.

अश्या पद्धतीने अनेक गोष्टी आणि घटना २०२५ मध्ये व्हायरल झाल्यात..