नगर : आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाची (ST Corporation) परिस्थिती सुधारण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. मात्र बस चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यातच आता कर्नाळा (Karnala) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेनं एसटी बस चालक आणि वाहकाला चपलांनी जबर मारहाण (Woman assaults ST bus driver and conductor) केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral video) झाला आहे.
नक्की वाचा : लाडक्या बहिणीसाठी पुन्हा आदिवासी विभागाचा निधी वळवला
धक्का लागला आणि वाद उफाळला! (Viral Video)
समोर आलेल्या माहितीनुसार, एसटी बसमुळे दुचाकीला किरकोळ धक्का लागला. यानंतर संबंधित महिला संतप्त झाली आणि तिने रागाच्या भरात चालक व वाहकाला अक्षरशः चपलांनी मारहाण केली. या प्रसंगाचे अनेकांनी व्हिडिओ चित्रीकरण केले. मात्र कोणीही चालकाला वाचवण्यासाठी पुढे आलं नसल्याचे समोर आलं आहे. ही घटना कर्नाळा डेपो परिसरात घडली आहे. डेपोमध्ये सुरक्षा रक्षक तैनात असतानाही त्यांनी हस्तक्षेप का केला नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी नेमलेले सुरक्षा रक्षक अशा वेळी निष्क्रिय का राहतात, यावर एसटी कर्मचारी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
अवश्य वाचा : अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी
‘कायद्याचा आदर राखला गेला पाहिजे’ (Viral Video)
या प्रकरणात संबंधित चालकाने कर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांनीही कोणतीही कारवाई केली नाही. मात्र,एसटी कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की,अशा घटनांमध्ये कायद्याचा आदर राखला गेला पाहिजे.अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून गुन्हा दाखल होणे आवश्यक असल्याचे संघनांचे म्हणणे आहे.