Virat Hindu Sammelan : राहुरी : राहुरी शहरात (Rahuri city) हिंदू जागरणच्या वतीने मंगळवारी (ता. २४) मार्चला सायंकाळी ६ वाजता विराट हिंदू संमेलनाचे (Virat Hindu Sammelan) आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन भागीरथीबाई तनपुरे कन्या शाळेच्या (Bhagirathibai Tanpure Girls School) प्रांगणात पार पडणार आहे.
नक्की वाचा : श्रीगोंदा न्यायालयातील ‘लोकअदालत’ मध्ये आठ हजार प्रकरणांचा निपटारा
यांची प्रमुख उपस्थिती राहणार
या संमेलनात संत परंपरेतील मान्यवर व धार्मिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. संत तुकाराम महाराजांचे १०वे वंशज तुकाराम महाराज मोरे, सुधाकर चतुर्वेदी, योगाचार्यजी महाराज, तसेच संत महिपती महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळकृष्ण महाराज कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
धार्मिक व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश दिला जाणार (Virat Hindu Sammelan)
यासोबतच हिंदू धर्म जागरण प्रांत मंडळाचे सदस्य सुनिल काळे हे देखील उपस्थित राहून हिंदू समाजातील विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या विराट हिंदू संमेलनाच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश दिला जाणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



