Virat Kohli Records : भारताचा स्टार फलंदाज म्हणून ओळख असलेला विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा रविवारी (ता.२३) पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात आपल्या बॅटसह धावांचा पाऊस पाडताना दिसला. दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Chanmpions Trophy 2025) स्पर्धेत झालेल्या सामन्यात विराटने शतक करत भारताला पाकिस्तानविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. विराटने या सामन्यात १११ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी केली. या शतकी खेळीसह विराटने अनेक विक्रम (Records) केले आहेत.
नक्की वाचा : ‘महसूल विभागात वशिला- शिफारशी चालणार नाहीत’-चंद्रशेखर बावनकुळे
विराटचा वनडे क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा टप्पा पार (Virat Kohli Records)
विराटचे वनडेमधील हे ५१ वे शतक आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण ८२ वे शतक आहे.तो वनडेतील सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याच्यापुढे फक्त सचिन तेंडुलकर आहे, ज्यांची १०० शतके झाली आहेत. दरम्यान, विराटने ही शतकी खेळी करताना वनडे क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा टप्पाही पार केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १४ हजार धावा करणारा फलंदाज तो आहे. त्याने केवळ २८७ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.
हेही पहा : नगरमध्ये बहरले काश्मिरी सफरचंद
तसेच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रिकी पाँटिंगला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याने या सामन्यात दोन झेलही घेतल्याने तो वनडेत सर्वाधिक झेल घेणारा भारतीय क्षेत्ररक्षकही झाला आहे. त्याने एकूण या सामन्यात केलेल्या विक्रमांवर एक नजर टाकू.
विराट कोहलीचे विक्रम:(Virat Kohli Records)
विराट पाकिस्तानविरुद्ध आयसीसी स्पर्धामध्ये ५ सामनावीर पुरस्कार जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोणालाही ३ वेळाही एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आयसीसी स्पर्धेत सामनावीर पुरस्कार जिंकता आलेला नाही.
वनडेत सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
* ५१ शतके – विराट कोहली (२९९ सामने)
* ४९ शतके – सचिन तेंडुलकर (४६३ सामने)
* ३२ शतके – रोहित शर्मा (२७० सामने)
* ३० शतके – रिकी पाँटिंग (३७५ सामने)
* २८ शतके – सनथ जयसूर्या (४४५ सामने)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
* १०० शतके – सचिन तेंडुलकर (६६४ सामने)
* ८२ शतके – विराट कोहली (५४६ सामने)
* ७१ शतके – रिकी पाँटिंग (५६० सामने)
* ६३ शतके – कुमार संगकारा (५९४ सामने)
* ६२ शतके – जॅक कॅलिस (५१९ सामने)
वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
* १८४२६ धावा – सचिन तेंडुलकर (४६३ सामने)
* १४२३४ धावा – कुमार संगकारा (४०४ सामने)
* १४०८५ धावा – विराट कोहली (२९९ सामने)
* १३७०४ धावा – रिकी पाँटिंग (३७५ सामने)
* १३४३० धावा – सनथ जयसूर्या (४४५ सामने)
सर्वात जलद १४ हजार वनडेतील धावा पूर्ण करणारे खेळाडू
* २८७ डाव – विराट कोहली
* ३५० डाव – सचिन तेंडुलकर
* ३७८ डाव – कुमार संगकारा
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे फलंदाज
* ३४३५७ धावा – सचिन तेंडुलकर (७८२ डाव)
* २८०१६ धावा – कुमार संगकारा (६६६ डाव)
* २७५०३ धावा – विराट कोहली (६१४ डाव)
* २७४८३ धावा – रिकी पाँटिंग (६६८ डाव)
* २५९५७ धावा – माहेला जयवर्धने (७२५ डाव)
वनडेत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
* ५ शतके – सचिन तेंडुलकर (६७ डाव)
* ५ शतके – ब्रायन लारा (४८ डाव)
* ४ शतके – डेव्हिड वॉर्नर (१४ डाव)
* ४ शतके – विराट कोहली (१७ डाव)
* ४ शतके – देसमंड हाईन्स (६५ डाव)
आयसीसी वनडेमध्ये सर्वाधिक वेळा ५०हुन अधिक धावा करणारे खेळाडू
* २३ वेळा विराट कोहली (५१ डाव)
* २३ वेळा – सचिन तेंडुलकर (५८ डाव)
* १८ वेळा – रोहित शर्मा (४० डाव)
* १७ वेळा – कुमार संगकारा (५६ डाव)
* १६ वेळा – रिकी पाँटिंग (६० डाव)
वनडेत सर्वाधिक झेल घेणारे भारतीय क्षेत्ररक्षक (यष्टीरक्षक नसलेले)
* १५८ झेल – विराट कोहली
* १५६ झेल – मोहम्मद अझरुद्दीन
* १४० झेल – सचिन तेंडुलकर
* १२४ झेल – राहुल द्रविड
* १०२ झेल – सुरेश रैना