Virat Kohli:मोठी बातमी!’किंग कोहली’चा कसोटी क्रिकेटला अलविदा

0
Virat Kohli:मोठी बातमी!'किंग कोहली'चा कसोटी क्रिकेटला अलविदा
Virat Kohli:मोठी बातमी!'किंग कोहली'चा कसोटी क्रिकेटला अलविदा

Virat Kohli : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि रनमशीन म्हणून ओळख असलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. दोन दिवसांपूर्वीच विराट कोहलीने टेस्टमधून (Test Cricket) निवृत्तीचे (Retirement) संकेत दिले होते. तसा निर्णयही त्याने बीसीसीआयला (BCCI) कळवला होता. त्यानंतर आत इंस्टाग्रामवर पोस्ट करत विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.

नक्की वाचा : ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोची एन्ट्री; पाकिस्तानच्या हालचालीवर इस्रोच्या १० उपग्रहांची नजर

विराट कोहलीच्या पोस्टमध्ये नेमकं काय ? (Virat Kohli)

विराट कोहलीने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, कसोटी क्रिकेटमध्ये सुरुवात करुन १४ वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर मी जे धडे सहन करेन ते शिकवले. पांढऱ्या जर्सीमध्ये खेळण्यात काहीतरी खोलवरचे वैयक्तिक गुण असतात. शांत खेळ, लांब दिवस, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात. या फॉरमॅटमधून बाहेर पडणे सोपे नाही पण ते योग्य वाटते.

मी माझ्याकडे जे काही होते ते सर्व दिले आहे आणि त्याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिले आहे. मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने ज्या सामन्यांमध्ये, ज्या लोकांसोबत मैदानात खेळलो, त्यांच्यासाठी आणि या प्रवासात मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीचा निरोप घेत आहे. पाठीमागे वळून बघताना मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसतमुखाने पाहीन,असे विराट कोहलीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अवश्य वाचा : ‘बोलायचं नसतं तर डायरेक्ट ॲक्शन घ्यायची असते’;शरद पवार यांचं भारत पाकिस्तान तणावादरम्यान वक्तव्य   

विराटने १२३ सामन्यात केलं भारताचं प्रतिनिधित्त्व  (Virat Kohli)

विराट कोहलीनं जून २०११ मध्ये किंग्स्टन इथं वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. त्या सामन्यात कोहलीनं पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात १५ धावा केल्या.त्याची शेवटची कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी इथं जानेवारी २०२५ मध्ये खेळली गेली होती. या शेवटच्या कसोटीत कोहलीनं पहिल्या डावात १७ धावा आणि दुसऱ्या डावात ६ धावा केल्या.विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने देशासाठी १२३ कसोटी सामने खेळले आहेत. विराटने २१० डावांमध्ये ४६.४५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ७ द्विशतके, ३० शतके आणि ३१ अर्धशतके आहेत.