Vishal Agarwal : नगर : माजी सैनिक हे अनुभव, शिस्त व देशभक्तीचे प्रेरणास्त्रोत असून आजही ते सर्वांना प्रेरणा देतात. माजी सैनिकांच्या (Ex-Serviceman) समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही मेजर जनरल विशाल अगरवाल (Vishal Agarwal) यांनी दिली. एमआयआरसी (मेकेनाइज्ड इन्फंट्री रेजीमेंटल सेंटर अँड स्कूल) (MIRC) येथील मैदानावर माजी सैनिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
नक्की वाचा : श्रीरामपुरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य नको : सुजय विखे पाटील
आदी मान्यवर उपस्थित
यावेळी मेजर जनरल विक्रम वर्मा, ब्रिगेडिअर सुनील कुमार, ब्रिगेडिअर राजेंद्रसिंह रावत, सैनिक कल्याण निधीचे अध्यक्ष दीपक थांगे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित होते.
अवश्य वाचा: हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?
मेजर जनरल अगरवाल म्हणाले, (Vishal Agarwal)
सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही माजी सैनिक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. देशसेवा करत असताना तसेच सेवानिवृत्तीनंतर माजी सैनिकांचे विविध क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. माजी सैनिकांसाठी आरोग्य, रोजगार व कल्याणाच्या विविध योजना शासनामार्फत राबविल्या जात आहेत. तसेच ‘स्पर्श’ प्रणालीच्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी वीरनारी उमा कुणाल गोसावी, प्रतिभा समुद्रे, रंजनाबाई जाधव, गोदावरी तावरे, दीपाली गायकर, मधुमालती केंद्रे, वीर माता मोतीबाई नागरगोजे, गोदाबाई नरवडे व सीताबाई राख यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अहिल्यानगर, सोलापूर, बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील विविध सैन्यदलांमध्ये कार्यरत राहिलेले माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, वीरनारी, वीरमाता तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



