Vishal Patil : स्काऊट गाईडचे कामकाज ठप्प, विद्यार्थ्यांचा विकास खुंटला : विशाल पाटील

Vishal Patil : स्काऊट गाईडचे कामकाज ठप्प, विद्यार्थ्यांचा विकास खुंटला : विशाल पाटील

0
Vishal Patil : स्काऊट गाईडचे कामकाज ठप्प, विद्यार्थ्यांचा विकास खुंटला : विशाल पाटील
Vishal Patil : स्काऊट गाईडचे कामकाज ठप्प, विद्यार्थ्यांचा विकास खुंटला : विशाल पाटील

Vishal Patil : नगर : स्काऊट गाईड (Scout Guide) ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत असलेली धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेली स्वयंसेवी संस्था आहे. या स्काऊट गाईड मधील काहींच्या गैरव्यवस्थापनामुळे क्रीडा विभागाची (Sports Department) प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक असलेल्या क्रीडा विभागाने स्काऊट गाईडचे काम पूर्ण बंद केले आहे. प्रशासक हटवून पुन्हा निवडणुका (Elections) घेऊन या विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी स्काऊट गाईड अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आक्रोश चळवळ सुरू केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत मेळावे घेतले जाणार आहे, अशी माहिती स्काऊट गाईड समितीचे कायदेशीर सल्लागार सदस्य ॲड. विशाल पाटील (Vishal Patil) यांनी दिली.

अवश्य वाचा : विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी – प्रताप सरनाईक

स्काऊट गाईडच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आक्रोश मेळावा

स्काऊट गाईडच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय आक्रोश मेळावा अहिल्यानगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी निवास सभागृहात झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. पाटील यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. मुख्य आयुक्त काशिनाथ बुचडे, प्रशिक्षण आयुक्त शशिकांत मस्के, शरद दळवी, प्रतीक कुऱ्हेकर, बाळासाहेब भोसले, अशोक भोसले, विकास लोखंडे, गाईड आयुक्त द्वारका वाळे, गाईड प्रशिक्षण आयुक्त संगीता गुंड, मुख्याध्यापक दिलीप पवार, मुख्याध्यापिका संगीता लांडगे आदींसह राज्यातील अडीचशे पदाधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा : सुपा येथे विमानतळ उभारा; खासदार नीलेश लंके यांची केंद्र सरकारकडे मागणी

ॲड. पाटील म्हणाले की, (Vishal Patil)

मुंबईत मरिन ड्राईव्ह सारख्या ठिकाणी तीन हजार स्वेअर फूट, शिवाजी पार्क येथे जागा, जिल्ह्याच्या ठिकाणी मैदाने, नऊ प्रशिक्षण केंद्र, अशी अब्जावधी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिणक विकासासाठी स्काऊट गाईडचे अधिकारी-कर्मचारी उपक्रम राबवित होते. स्काऊट गाईडच्या २९७ मंजूर पदांना राज्य सरकारकडून पगार दिला जात होता. सध्या २४० पदांवरील अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. स्काऊट गाईडमधील काहींनी गैरव्यवस्थापन केल्याने राज्य सरकारने २०१८ मध्ये प्रशासक म्हणून क्रीडा विभागाची नियुक्ती केली. या विभागातील काही अधिकाऱ्यांनीही गैरव्यवहार केला आहे. स्काऊट गाईडच्या २४० कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती क्रीडा विभागात करण्यात आली. त्यांच्याकडून क्रीडा विभागाचे काम करून घेतले जात आहे. त्यामुळे स्काऊट गाईडचे काम ठप्प झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठका झाल्या आहेत. त्यांनी चौघांची समिती स्थापन केली आहे. प्रशासक हटवून निवडणुका घेऊन पुन्हा या विभागाचे कामकाज पूर्ववत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेणे, चळवळीला गती दिली जाणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रशासकीय समिती
उपमुख्यमंत्री अजित पवार व तत्कालीन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत मुंबईला एक बैठक घेऊन प्रशासकीय समिती स्थापन केली. त्यामध्ये आमदार विजयसिंह पंडित, स्काऊट गाईडचे राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी म्हणून राजेंद्रकुमार कौशिक, ॲड. विशाल पाटील आणि क्रीडा उपायुक्त दीक्षित यांची नेमणूक केली आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी स्काऊट गाईड निसर्ग शिबिर, स्वयंसंरक्षण प्रशिक्षण, श्रमप्रतिष्ठा आदी उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांगिण विकासासाठी १९५३ पासून कार्यरत आहे. आदर्श नागरिक घडविण्याचे महत्त्वाचे काम केले जात आहे. स्काऊट गाईडचे काम ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी ९० टक्के कमी झाली आहे.

  • शरद दळवी, अहिल्यानगर

स्काऊट गाईडला पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. याबाबत विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवला जाईल.

  • संग्राम जगताप, आमदार

क्रीडा अधिकाऱ्यांची मुजोरी मोडून काढणार आहे. प्रशासकीय समिती स्थापन केली असताना क्रीडा अधिकाऱ्यांनी या समितीला सहकार्य करणे गरजचे आहे. त्यांनी सहकार्य न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.