Vishalgad: विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही, कोल्हापूरच्या नव्या एसपींचा आदेश

0
Vishalgad:विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही, कोल्हापूरच्या नव्या एसपींचा आदेश
Vishalgad:विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही, कोल्हापूरच्या नव्या एसपींचा आदेश

नगर : विशाळगडावर (Vishalgad) कोणताही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही,असा आदेश कोल्हापूरचे नवीन जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता (Yogeshkumar Gupta) यांनी दिला आहे. ईदच्या (Bakri Eid) पार्श्वभूमीवर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकते. या कारणाने जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या आधी हायकोर्टाने विशाळगडावर ईदच्या कुर्बानी ला परवानगी दिली होती. त्याला प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

नक्की वाचा : गृहकर्ज,वाहन कर्ज स्वस्त होणार;रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला

कुर्बानीला उच्च न्यायालयाची परवानगी (Vishalgad )

दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने विशाळगडवर बकरी ईदच्या कुर्बानीला परवानगी दिली होती. त्या आधी उरुसावेळी फक्त स्थानिकांना कुर्बानी देण्यास परवानगी दिली होती. यंदाच्या बकरी ईदला स्थानिक तसेच भक्तांनाही कुर्बानी देण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.

अवश्य वाचा : ‘लाडक्या बहि‍णींना सरकारने केवळ मतांसाठी चटक लावली’- यशोमती ठाकूर   

तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार (Vishalgad )

विशाळगड बकरी ईद कुर्बानी प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यात यावी आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. विशाळगडवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं कारण त्यामागे देण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयात या आधीच्या घटनांचाही संदर्भ देण्यात आला होता. परंतु या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला.