Vishwas Nangare Patil : महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांच्या एआय चेहऱ्याआडून (AI face) एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला (Retired officers) लुटल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar)घडली आहे. दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात २० लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी ६ दिवसांत तब्बल ७८ लाख ६० हजारांना लुटले आहे. यावेळी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडले होते.
नक्की वाचा : ‘गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव’;विधानसभेत मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Vishwas Nangare Patil)
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता सेवानिवृत्त अधिकाऱ्याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात ९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहे. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अशाप्रकारचे फेक कॉल येत असतील तर नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेले ७७ वर्षीय पोलिस अधिकारी हे विभागीय आयुक्तालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. २ जुलै २०२५ रोजी त्यांना पोलिसांचा गणवेश घातलेल्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला. संजय पिसे असे नाव असून आपण नांगरे पाटील यांचा सहकारी असल्याची बतावणी केली. सुरूवातीला त्यांना हा फोन फेक असल्याचे लक्षात आले नाही.
अवश्य वाचा : चित्रांगदा सिंग सलमान खानसोबत ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार
फसवणूक करणारी व्यक्ती नेमकी कोण? (Vishwas Nangare Patil)
फोन केलेल्या व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सांगितले की, तुमच्या पत्नीच्या बँक खात्यात २ कोटींचा बेहिशेबी व्यवहार झाला आहे. त्याचा संबंध दहशतवादी अब्दुल सलाम याच्यासोबत निष्पन्न झाला आहे. त्याच्याकडून तुम्हाला २० लाख रुपये आल्याने एनआयएकडून तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तुम्हाला अटक केला जाईल, अशी थाप त्यांनी मारली. त्यामुळे तक्रारदार घाबरून गेले. फोन करणाऱ्याने थेट आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्याशी सल्लामसलत करण्याचा सल्ला दिला होता.
डिजिटल अरेस्टची बाब राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने कोणालाही सांगितल्यास कुटुंबाला अटक करून संपत्ती जप्त करण्यात येईल,असा इशारा त्या वृद्धाने दिला. तक्रारदाराने त्यांच्यासह पत्नीच्या नावे असलेले ७८ लाख ६९ हजार रुपये २ ते ७ जुलैपर्यंत सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या ३ बँक खात्यांवर पाठवले आहेत.