Vivek Kolhe : नगर : नाशिक मतदार संघाच्या निवडणुकीत किशोर दराडे नावाचे अपक्ष उमेदवार देखील रिंगणात उतरले आहेत. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) आणि त्यांच्या समर्थकांकडून किशोर दराडे नावाच्या अपक्ष उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी महायुतीचे (Mahayuti) किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घेण्यासाठी दबाव टाकल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.
अवश्य वाचा : विधानसभा निवडणुकीत तुतारीला पिपाणीचं टेन्शन!
२६ जून रोजी मतदान तर १ जुलैला मतमोजणी
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर किशोर दराडे यांनी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
हे देखील वाचा : कंगनाच्या कानशिलात मारणाऱ्या महिलेला १ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला (Vivek Kolhe)
डमी उमेदवार किशोर दराडे यांनी शर्टचे बटन तोडल्याचे मान्य केले आहे. मात्र, कोणी धक्काबुक्की आणि मारहाण केली हे माहीत नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महसूल आयुक्त कार्यालयात शिवसेना शिंदे व ठाकरे गट आमनेसामने आले व दोन्ही गटाने एकमेकासमोर घोषणाबाजी केल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.