Vivek Kolhe : विवेक कोल्हेंच्या प्रयत्नामुळे शिर्डी एमआयडीसीचा मार्ग मोकळा

शिर्डी एमआयडीसी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेती महामंडळाची जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याने बेरोजगारीला मोडीत काढण्यासाठी मोठी मदत होणार आहे. यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला आहे.

0
विवेक कोल्हेंच्या प्रयत्नाला यश; शिर्डी एमआयडीसीचा मार्ग मोकळा

Kopargaon : कोपरगाव : शिर्डी एमआयडीसी (Shirdi MIDC) होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेती महामंडळाची जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याने बेरोजगारीला मोडीत काढण्यासाठी मोठी मदत होणार आहे. यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या (Sanjeevani Youth Foundation) वतीने गेल्या पाच वर्षापासून पाठपुरावा केल्याबद्दल युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांचा सत्कार करण्यात आला आहे.

नक्की वाचा : आजपासून एलपीजी गॅस महागला !

बेरोजगारी मोडीत काढण्यासाठी विवेक कोल्हे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सोनेवाडी, चांदेकसारे,सावळीविहीर,संवत्सर,वारी येथील शेती महामंडळाची जमीन मिळाल्याने त्यावर एमआयडीसी झाल्यास युवकांना मोठा रोजगार उपलब्ध होईल. यासाठी २०१९ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पाठपुरावा केला होता. त्याचे फलित होऊन विवेक कोल्हे यांच्या सततच्या लढ्याला यश आले आहे.

हेही वाचा : गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’चं पोस्टर प्रदर्शित

कोपरगाव तालुका आणि राहता तालुक्यातील शेती महामंडळाची जमिनीवर ही प्रस्तावित एमआयडीसी हजारो युवकांचे हात बळकट करणार आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवत सुरू केलेला हा लढा पूर्णत्वास गेल्याने इथे बाजारपेठ फुलण्यास मोठी मदत या निमित्ताने होणार आहे. शेती,रोजगार,युवा सशक्तीकरण सुनियोजित होऊन कोपरगाव राज्याचे एक महत्वाचे केंद्र बनणार आहे. यासाठी विवेक कोल्हे यांचा सत्कार करून अभिनंदन केले जात आहे.

यावेळी प्रसिद्ध व्यापारी नारायणशेठ अग्रवाल, कारखाना संचालक बापूसाहेब बारहाते, माजी सभापती संभाजी रक्ताटे, देवयानी बँकेचे व्हाईस चेअरमन रेवजी आव्हाड, ॲड.अशोक टुपके,गोरख आहेर, पी.सभारांजक आदींसह मान्यवरांनी कोल्हे यांचा सत्कार केला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here