नगर : बॉलिवूडच्या (Bollywood News) अनेक सिनेमांमध्ये खुंखार मुघल बादशाह औरंगजेबाची (Mughal Emperor Aurangzeb) कहाणी दाखवण्यात आली आहे. अशातच आता आणखी एक बॉलिवूड अभिनेता औरंगजेबची (Aurangzeb) भूमिका साकारण्याची तयारी करत आहे. बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा आगामी सिनेमात मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे.
नक्की वाचा: महाराष्ट्रात थंडीची चाहूल! हवामान विभागाचा अंदाज काय ?
अभिनेता विवेक ओबेरॉय औरंगजेबाची भूमिका साकारणार (Vivek Oberoi)

समोर आलेल्या माहितीनुसार,’कांतारा चॅप्टर १’ नंतर ऋषभ शेट्टी त्याच्या आगामी ‘द प्राइड ऑफ इंडिया:छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे.आता,या चित्रपटात एका नव्या सुपरस्टारची एन्ट्री होणार आहे. या सिनेमात अभिनेता विवेक ओबेरॉय औरंगजेबाची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. तर,अभिनेत्री शेफाली शाह राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारणार आहे. आता विवेक ओबेरॉयची औरंगजेबाच्या भूमिकेतील एंट्री आणि मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील ऐतिहासिक संघर्ष पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अवश्य वाचा: मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात
ही माहिती समोर आल्यानंतर विवेक ओबेरॉयचे चाहते खूप खूश आहेत. मात्र अजून अधिकृतपणे मेकर्सनी यावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. लवकरच फिल्म मेकर्स फिल्मच्या स्टारकास्टबाबत खुलासा करू शकतात.



