Ameen Sayani : रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

अमीन सयानी यांना वृद्धापकाळामुळे उच्च रक्तदाब आणि इतर शारीरिक व्याधींनी ग्रासले होते. गेल्या १२ वर्षांपासून त्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांना चालताना वॉकर वापरावा लागत असे.

0
Ameen Sayani
Ameen Sayani

नगर : रेडिओच्या दुनियेतील आवाजाचा जादूगार, ज्येष्ठ सूत्रसंचालक, उद्धोषक अश्या एक ना अनेक उपाध्यांनी गौरवण्यात आलेले अमीन सयानी (Ameen Sayani Passed Away) यांचे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी अमीन सयानी यांच्या निधनाविषयी माहिती दिली. अमीन सयानी यांना आज (ता.२१) सकाळी सहा वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने एच.आर. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अमीन सयानी यांच्या जाण्याने रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपला भावना व्यक्त होत आहे.

नक्की वाचा : माेफत वीज हवी; अशी आहे पंतप्रधान सूर्यघर माेफत वीज याेजना

अमीन सयानींच्या आवाजाने प्रेक्षकांना मोहिनी (Ameen Sayani)

अमीन सयानी यांना वृद्धापकाळामुळे उच्च रक्तदाब आणि इतर शारीरिक व्याधींनी ग्रासले होते. गेल्या १२ वर्षांपासून त्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांना चालताना वॉकर वापरावा लागत असे. रेडिओ सिलोन आणि विविध भारती चॅनलवरील ‘बिनाका गीतमाला’ या त्यांच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मोहिनी घातली होती. प्रत्येक आठवड्याला रेडिओ प्रेमी त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतुर असायचे. अमीन सयानी यांच्या नावावर रेडिओवरील ५४ हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम होते. हे कार्यक्रम प्रोड्युस करणे, त्यांना व्हॉईसओव्हर देण्याचे काम देखील त्यांनीच केले होते.अमीन सयानी यांनी जवळपास १९ हजार जिंगल्सना आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये झाली होती.

अवश्य वाचा : राहुल गांधींना दिलासा; ‘त्या’ प्रकरणात जामीन मंजूर

‘गीतमाला’ कार्यक्रमाने अमीन सयानींना मिळाली ओळख  (Ameen Sayani)

रेडिओवर १९५२ साली सुरु झालेल्या ‘गीतमाला’ या कार्यक्रमाने अमीन सयानी यांना प्रसिद्धीची शिखरावर नेऊन ठेवले. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी होती की, रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सयानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास ६५ हजार पत्रं यायची. या गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला फक्त ७ गाणी होती. ही संख्या नंतर १६ पर्यंत वाढवण्यात आली. त्यावेळी अमीन सयानी दिवसाला १२ तास काम करायचे. त्या दिवसांची आठवण सांगताना अमीन सयानी यांच्या मुलाने सांगितले की, रविवार सोडून मला वडील कधीच भेटायचे नाहीत. ते त्यांच्या स्टुडिओमध्ये कामात असायचे.

हेही पहा : बेलवंडी पोलिसांनी राबविला “फिरते पोलीस स्टेशन” उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here