Vote Counting : नगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections) नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. परंतु आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये (EVM Machine) फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची (Vote Counting) मागणी केली आहे. अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी इलेक्शन कमिशनकडे ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणी मागणीची केली होती. ती मागणी मान्य झाली आहे.
नक्की वाचा : ‘देशात पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार’-नितीन गडकरी
निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची केली होती मागणी
सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली होती. प्रति युनिट 40 हजार आणि 18 टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बडगुजर यांना पत्र दिले आहे.
अवश्य वाचा : जिल्ह्यात मंत्रिपदासाठी कोणाची लागणार वर्णी?
बडगुजर यांना मिळाली होती 73 हजार 651 मते (Vote Counting)
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. तर सुधाकर बडगुजर दुसऱ्या स्थानावर आहेत. सीमा हिरे यांना 1 लाख 41 हजार 725 मते मिळाली आहेत. तर सुधाकर बडगुजर यांना 73 हजार 651 मते मिळाली आहेत. तर मनसेच्या उमेदवाराला 46 हजार 649 मते मिळाली आहेत.