Voter awareness : कर्जत: येथे स्वीप समितीच्या वतीने “मतदार जागृती लोकोत्सवाचे” (Voter awareness) आयोजन करण्यात आले असून उत्कृष्ट उपक्रम राबवणाऱ्या गावांना “आदर्श लोकशाहीची गाव” या पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती निवडणूक (Election) निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली. जास्तीत- जास्त गावांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed Constituency) निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले.
नक्की वाचा: दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हे
‘आदर्श लोकशाही गाव’ या लोकउत्सवाचे आयोजन
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ मध्ये मतदार जनजागृतीद्वारे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कर्जत तालुक्यातील विविध गावामध्ये ८ ते १९ नोव्हेंबर दरम्यान विविध दिनांचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून कर्जत तालुका स्वीप समितीच्यावतीने गावपातळी स्तरावर स्तरावर ‘आदर्श लोकशाही गाव’ या लोकउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.८) कुळधरण आणि राक्षसवाडी बुद्रुक भाजी मंडई व बाजारात मतदार शपथ, निवडणूक गीत गायन घेण्यात आले.
अवश्य वाचा: संजय राऊतांची राहुल जगतापांवर जोरदार टीका; पाचपुतेंचाही घेतला समाचार
मतदार जनजागृती बाईक रॅली (Voter awareness)
यासह शनिवारी चांदे बुद्रुक येथे रांगोळी स्पर्धा व मतदार शपथ आणि दिव्यांगाची मुलाखत घेण्यात येणार आहे. यासह पुढील दिवसांत अनुक्रमे बिटकेवाडी आणि शिंदे गावात पथनाटय व खेळाडूचे मार्गदर्शन व किर्तन सोहळा, सोमवारी कर्जत शहराच्या आठवडे बाजाराच्या दिवशी मतदार जनजागृती बाईक रॅली तसेच मतदान जनजागृती भेट होणार असून सोनमाळी कन्या विदयालयात चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडणार आहे. मंगळवारी राशिन बाजारात मानवी साखळी व पथनाटय संपन्न होणार आहे. बुधवारी मिरजगांव या ठिकाणी सर्व विद्यालयात विदयार्थ्यांद्वारे पालकांना मतदान करणेसाठी संकल्प पत्र, पथनाटय, सायकल रॅली, पोस्टर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात येईल. गुरुवारी वालवड व कर्जत दादा पाटील महाविदयालयात मतदान करणेसाठी शपथ, पथनाट्य, रांगोळी स्पर्धा आणि मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यासह १९ नोव्हेंबरपर्यंत विविध ठिकाणी मतदान जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन असून यात सहभागी होणाऱ्या गावांना “आदर्श लोकशाहीची गाव” या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर बीएलओ मार्फत प्रत्येक मतदारांच्या घरोघरी भेटींच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करणे, मतदान केंद्र विषयक माहिती देणे, मतदान कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्याचे उपक्रम हाती घेण्यात आले आहे. या कामी कर्जत तहसीलदार गुरु बिराजदार, स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड, निवडणूक नायब तहसीलदार योगेश्वर जाधव यांच्यासह स्वीप समितीचे सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.