Voter Awareness : मॅरेथॉन दौड करत मतदार जनजागृती

Voter Awareness : मॅरेथॉन दौड करत मतदार जनजागृती

0
Voter Awareness : मॅरेथॉन दौड करत मतदार जनजागृती
Voter Awareness : मॅरेथॉन दौड करत मतदार जनजागृती

Voter Awareness : कर्जत : कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक (Assembly Elections) विभाग, स्वीप समिती आणि दादा पाटील महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालयाच्या एनसीसी छात्रसैनिकांनी मतदार जनजागृती (Voter Awareness) मॅरेथॉन दौड पार पाडली. या मॅरेथॉन (Marathon) रॅलीस कर्जतचे तहसीलदार गुरू बिराजदार यांनी हिरवा झेंडा दाखवत प्रारंभ केला. यावेळी प्राचार्य डॉ. संजय नगरकर, नायब तहसीलदार योगेश्वर जाधव, स्वीप समितीच्या उज्वला गायकवाड आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : झाशीमध्ये मृत्यूतांडव! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा मृत्यू

मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम

२० नोव्हेंबर रोजी राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मतदानाची टक्केवारी वाढवावी, या उद्देशाने मतदार जनजागृतीसाठी स्वीप समिती विविध उपक्रम राबवत आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात आठवडे बाजार, मोठ्या गावात मतदार जनजागृती पथनाट्य, मोटारसायकल रॅली यासह प्रभातफेरी काढत मतदारांना जागृत करण्यात येत आहे.

Voter Awareness : मॅरेथॉन दौड करत मतदार जनजागृती
Voter Awareness : मॅरेथॉन दौड करत मतदार जनजागृती

अवश्य वाचा : शेतकरी व नागरिकांनी आमदारांच्या फोटोला दुग्धाभिषक करत केले अनोखे स्वागत

छात्रसैनिकांच्या घोषणांनी दणाणून सोडला परिसर (Voter Awareness)

याच अनुषंगाने शनिवारी (ता.१६) सकाळी ९ वाजता निवडणूक निरीक्षक डी रत्ना, प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभाग कर्जत-जामखेड, स्वीप समिती आणि कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालयाच्या एनसीसी छात्रसैनिकांनी मतदार जनजागृती मॅरेथॉन दौड केली. या दौडीत भारतीय ध्वज हाती घेत “मतदान करा. लोकशाही बळकट करा, मतदार राजा जागा हो. लोकशाहीचा धागा हो, छोडकर सारे काम. चलो करे मतदान, मतदानाचा अभिमान. हीच आहे लोकशाहीची शान, मतदानाची संधी छान. उंचवू आपल्या राष्ट्राचा मान” अशा घोषणांनी छात्रसैनिकांनी शहर परिसर दणाणून सोडला होता. दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून सुरू झालेली मॅरेथॉन दौड शहराच्या सर्व भागातून जात कर्जत तहसील कार्यालयाच्या आवारात समारोप करण्यात आला. या दौडीत सर्व शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.