Voter Awareness : नगर : “लोकशाहीमध्ये अधिकार, कर्तव्य, हक्क, भावना या घटकांना महत्त्वाचे स्थान आहे. एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कोट्यावधी जनमाणसावर असतो. तो प्रभाव जनमत घडवत असतो.अशा व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून मतदार जनजागृती (Voter Awareness) होणे ही सुसंधी असते. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा स्वीप समितीचा “डी-व्हिडिओ ” हा अशा लोकप्रिय व्यक्तींचे व्हिडिओ संकलनाचा उपक्रम स्तुत्य आहे.,” असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन (Pravin Mahajan) यांनी केले.
नक्की वाचा : झाशीमध्ये मृत्यूतांडव! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा मृत्यू
दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या मतदार जनजागृती विषयक व्हिडिओ
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार विधानसभेत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी देशातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या मतदार जनजागृती विषयक व्हिडिओ संकलित करून ‘डी-व्हिडिओ’ हा उपक्रम सध्या सोशल मीडियावर गौरवला जात आहे. या उपक्रमाच्या विमोचन प्रसंगी ते बोलत होते.
अवश्य वाचा : शेतकरी व नागरिकांनी आमदारांच्या फोटोला दुग्धाभिषक करत केले अनोखे स्वागत
आदी उपस्थित (Voter Awareness)
डी-व्हिडिओ म्हणजे Do Vote For Democracy Often म्हणजेच लोकशाहीसाठी सातत्याने मतदान करा. यावेळी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गजानन नकासकर, जिल्हा मतदारदूत डॉ. अमोल बागुल आदी उपस्थित होते.