Voter List : नगर : महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर (Voter List) आलेल्या हरकतींवर पडताळणी करून व स्थळ पाहणी करून निर्णय घेतला जात आहे. मतदार यादीतील नावाबाबत हरकती दाखल करण्यासाठी मतदार व तक्रारदारांसाठी स्वतंत्र अर्ज आहेत. ज्या तक्रारदारांना (Complainant) हरकत घ्यायची असेल त्यांनी ब नमुना अर्जाद्वारे हरकत दाखल करावी. तसेच, हरकती दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) ३ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम जाही
राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार हरकती दाखल करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यावर निर्णय होऊन १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तसेच, १५ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तर, २२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
मतदार याद्या महापालिकेच्या अधिकृत पेजवर प्रसिध्द (Voter List)
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या कामासाठी कोणत्याही खासगी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत होत असलेले आरोप खोटे व अफवा पसरवणारे आहेत. हरकती दाखल करण्यासाठीचे मतदार व संकेतस्थळावर, तक्रारदारांचे स्वतंत्र अर्ज, हरकती कोठे जमा करायच्या याची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचावी यासाठी अधिकृतपणे तसेच महापालिकेच्या अधिकृत पेजवर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी मतदार व तक्रारदारांसाठी उपलब्ध असलेल्या अर्जानुसार हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन यांनी केले आहे.



