Voter List : अहिल्यानगर महापालिकेच्या या प्रभागात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त; प्रारुप मतदार यादीत बदल नाही

Voter List : अहिल्यानगर महापालिकेला मतदार यादीतून ३९ हजार ७४६ नावे वगळावी लागली; या प्रभागात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त

0

Voter List : नगर : अहिल्यानगर महापालिकेने (AMC) प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी (Voter List) आज (ता. १५) जाहीर केली. त्यानुसार १७ प्रभागांमध्ये तीन लाख सात हजार नऊ मतदार आहेत. प्रारुप मतदार यादीवर नागरिकांनी घेतलेल्या हरकतीनंतर महापालिका प्रशासनाने (Municipal administration) मतदार यादीत बदल केलेला नाही.

नक्की वाचा: राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद;महापालिका व जिल्हा परिषदेच्या तारखा जाहीर होणार?

प्रभाग ५, १० व १३मध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त

प्रारुप मतदार यादीवर अनेकांनी हरकती नोंदविल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरातून आलेल्या हरकती पाहता अंतिम मतदार यादी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात बदल केले होते. त्यानुसार आज महापालिका प्रशासनाने अंतिम मतदार यादी जाहीर केली. अंतिम मतदार यादीनुसार एक लाख ५५ हजार ५२३ पुरुष, एक लाख ५१ हजार ३७८ महिला तर १०८ इतर मतदार आहेत. प्रभाग ५, १० व १३मध्ये चक्क पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे.

Voter List : अहिल्यानगर महापालिकेला मतदार यादीतून ३९ हजार ७४६ नावे वगळावी लागली; या प्रभागात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त
Voter List : अहिल्यानगर महापालिकेला मतदार यादीतून ३९ हजार ७४६ नावे वगळावी लागली; या प्रभागात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त

अवश्य वाचा: ‘मनरेगा’तून महात्मा गांधींचे नाव गायब होणार,’विकसित भारत जी राम जी’ नावाने नवा कायदा

अहिल्यानगर महापालिकेची प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी (Voter List)

जाणून घ्या तुमच्या प्रभागात किती मतदार

प्रभाग क्रमांक – मतदार – पुरुष – महिला – इतर

१ – २२,०८८ – ११,२७० – १०,८१८ – ०

२ – २१,५१३ – ११,०४८ – १०,४६५ – ०

३ – १४,५२७ – ७,४२४ – ७,१०३ – ०

४ – १९,२५६ – ९,६४४ – ९६,०१२ – ०

५ – १४,९५० – ७,२५५ – ७,६०३ – ९२

६ – १७,१५० – ८,५९१ – ८,५५९ – ०

७ – १५,८३३ – ७,९४० – ७,८९३ – ०

८ – १८,०२० – ९,४३२ – ८,५८६ – २

९ – १७,१५९ – ८,५५६ – ८,६०२ – १

१० – २२,९०० – ११,४२० – ११,४७९ – १

११ – २०,६७० – १०,४७४ – १०,१९६ – ०

१२ – १९,३८२ – ९,७६० – ९,६२२ – ०

१३ – १५,७२३ – ७,८४३ – ७,८८० – ०

१४ – १७,०२० – ८,७१२ – ८,३०८ – ०

१५ – १६,६५६ – ८,४८७ – ८,१६६ – ३

१६ – १८,८७४ – ९,७८५ – ९,०८९ – ०

१७ – १५,२८८ – ७,८८२, ७,३९७ – ९

एकूण – ३,०७,००९ – १,५५,५२३ – १,५१,३७८ – १०८