Voter List : राहुरी विधानसभा मतदार यादीवर ४ हजार ६०० हरकती!; १४ फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी

Voter List : राहुरी विधानसभा मतदार यादीवर ४ हजार ६०० हरकती!; १४ फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी

0
Voter List : राहुरी विधानसभा मतदार यादीवर ४ हजार ६०० हरकती!; १४ फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी
Voter List : राहुरी विधानसभा मतदार यादीवर ४ हजार ६०० हरकती!; १४ फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी

Voter List : नगर : राहुरी विधानसभा निवडणुकीच्या रिक्त (Rahuri Assembly Constituency Election) झालेल्या जागेसाठी १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित या विशेष मोहिमेअंतर्गत ६ जानेवारी रोजी प्रारूप मतदार यादी (Voter List) प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर प्रसिध्द झाल्या प्रारूप मतदार यादीवर ४ हजार ६०० हरकती (Objections) दाखल झालेल्या आहेत. या हरकतींवर ७ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी होणार आहे.

अवश्य वाचा: जिह्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत,पाणंद रस्ते योजने’ला गती‌!: जिल्हाधिकारी आशिया

३८ गावात वेगळीच चर्चा

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राहुरी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी आणि यादीतील तपशील दुरुस्तीची मुदत मागील महिन्यांत २४ जानेवारीला संपली. त्यानंतर त्या यादीवर दावे आणि हरकती स्वीकारण्यात आल्या होत्या. या हरकतीवर ७ फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेऊन १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.दरम्यान, दाखल हरकतीवरून पाथर्डी तालुक्यातील ३८ गावात वेगळीच चर्चा सुरू आहे.

नक्की वाचा: पैसे दुप्पटच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हरकतींवरून पाथर्डी तालुक्यात गोंधळ (Voter List)

दाखल करण्यात आलेल्या २ हजार ३०० हरकतीमध्ये हरकत दाखल करणाऱ्यांनाच याबाबत माहिती नसल्याचे चर्चा सुरू आहे. हरकत दाखल करणाऱ्यांच्या याद्या सोशल मीडियावर झळकल्यानंतर संबंधीतांना आपल्या नावाने मतदार यादीवर हरकती दाखल झाल्याचे समजले आहे. मात्र, ही हरकत आपण दाखल केली नसल्याचा दावा अनेकांनी केला असून यामुळे दाखल हरकतींवरून पाथर्डी तालुक्यात गोंधळ निर्माण झाला आहे.