Voter registration : शिक्षकाने बनवला मतदार नोंदणीचा ‘वन नेशन-वन क्यू आर कोड’

नगर : "येत्या वर्षातील विविध निवडणुकांमध्ये (Elections) मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्याबरोबरच मतदार नोंदणी (Voter registration) करून निःपक्षपाती मतदान करणे हे प्रत्येक सक्षम भारतीयाचे कर्तव्य आहे.

0
Voter registration : शिक्षकाने बनवला मतदार नोंदणीचा 'वन नेशन-वन क्यू आर कोड'
Voter registration : शिक्षकाने बनवला मतदार नोंदणीचा 'वन नेशन-वन क्यू आर कोड'

Voter registration : नगर : “येत्या वर्षातील विविध निवडणुकांमध्ये (Elections) मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्याबरोबरच मतदार नोंदणी (Voter registration) करून निःपक्षपाती मतदान करणे हे प्रत्येक सक्षम भारतीयाचे कर्तव्य आहे. मतदार नोंदणीसाठी जिल्हा मतदारदूत तथा बीएलओ शिक्षक डॉ. अमोल बागूल (Amol Bagul) यांनी संपूर्ण भारतातील मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी एकच असलेला हा क्यू आर कोड (QR code) बनवून स्कॅन अँड वोट प्रक्रिया अधिकच सुलभ केली आहे.” असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी केले.

हे देखील वाचा : टी-२० च्या दुसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वालची यशस्वी वाटचाल


संविधान दिन तसेच प्रशासनातर्फे आयोजित दोन दिवसीय मतदार नोंदणी अभियानाच्या निमित्ताने डॉ.बागुल यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेतील ऑफलाइन व ऑनलाईन अडचणी लक्षात घेता यातील सर्व अर्ज घरबसल्या भरता येतील असा एकच ‘वन नेशन वन क्यू आर कोड’ तयार केला आहे. या उपक्रमाच्या १५ बाय ८ या भव्य आकाराच्या क्यू आर कोड माहिती फलकाचे अनावरण उपजिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते  झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगर तहसीलदार संजय शिंदे, नायब तहसीलदार सुधीर उबाळे तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व रेणावीकर प्रशाला मतदान केंद्रातील बीएलओ उपस्थित होते.

नक्की वाचा : हाऊसफुल्ल… ‘नाना थोडं थांबा ना


डॉ. अमोल बागूल यांनी सांगितले की, ‘स्कॅन अँड वोट’मुळे वेळ, पैसे व इंधन याची बचत होणार आहे. नि:शुल्क पद्धतीने राष्ट्रीय मतदार ओळखपत्र नवमतदाराला घरबसल्या प्राप्त होणार आहे. मोबाईलचा कॅमेरा तसेच गुगल सर्चमधील कॅमेऱ्याच्या माध्यमातून अवघ्या एका सेकंदात भारत निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी प्रक्रियेची वेबसाईट लिंक ओपन होते. दोन दिवसांमध्ये शेकडो नवमतदारांनी क्यू आर कोड स्कॅन करून मतदार नोंदणी प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण केली. भारतातील महत्त्वाच्या सुमारे १४ भाषांमधून निवडणूक आयोगाचे नोंदणी अर्ज उपलब्ध असलेला हा क्यू आर कोड सोशल मीडियावर सर्वांसाठी पाठवला जाणार आहे.”असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here