Voting : ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

Voting : ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

0
Voting

Voting : कर्जत : कुकडी आणि सीना धरणाचं (Kukdi and Seena Dam) पाणी उशाला असून त्याचा फायदा निमगाव डाकू गावास होत नाही. याबाबत खासदार, दोन्ही विद्यमान आमदार आणि पालकमंत्री यासह तालुका प्रशासनाकडे वारंवार ग्रामस्थांनी पाण्याची मागणी करून देखील त्याचा विचार केला जात नाही. याच्याच निषेधार्थ आगामी लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभेच्या निवडणुकीवर (Voting) निमगाव डाकूच्या ग्रामस्थांनी बहिष्कार (Boycott) घालण्याचा एकमुखाने निर्णय घेतला आहे. सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर निर्णय घेत आपली भूमिका जाहीर केली.

हे देखील वाचा: नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार

अनास्थेबाबत ग्रामस्थांचा सवाल (Voting)

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू कुकडी आणि सीना धरण आवर्तनाच्या लाभक्षेत्रात येत आहे. ग्रामपंचायत यासह ग्रामस्थ रीतसर असणारी शासनाची पाणीपट्टी देखील भरतात. गावाच्या शीवलगत पाणी येत असून फक्त निमगाव डाकूलाच या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. परिसरात सध्याच्या घडीला तीव्र पाणी टंचाई आणि दुष्काळी परिस्थिती जाणवत आहे. या प्रश्नांवर आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे देखील ग्रामस्थांनी या भागाला आवर्तन मिळावे, अशी विनंती केली. तसेच तालुका प्रशासनास सर्व परिस्थिती कथन केली. मात्र दोन्ही पातळीवर निमगाव डाकूच्या ग्रामस्थांची बोळवण करण्यात आली. लोकप्रतिनिधीना मतदानाची गरज असताना आमची आठवण येते. मात्र, तीच आठवण आमच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसंबंधी, मिळणाऱ्या सुविधा देण्यासाठी का राहत नाही? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी यावेळी उपस्थित करीत या कार्यपद्धतीचा बैठकीत निषेध केला.

Election Commission

नक्की वाचा: तीन पिढ्यांचा संसार जमीनदोस्त; बेघर झालेल्यांना अश्रू अनावर

स्थानिक नेत्यांना गावबंदीचा इशारा (Voting)

त्यांना आमच्या मागण्या पूर्ण करता येत नसेल तर आम्हाला पण अशा लोकप्रतिनिधीची गरज नाही. जर दोन दिवसांत निमगाव डाकूस पाणी न मिळाल्यास लोकसभा, विधानसभा आणि आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद – पंचायत समितीच्या निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासह तालुक्यातील स्थानिक नेत्यांना देखील गावबंदी करण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला. यावेळी महेश मेहेत्रे, नागेश जाधव, ईश्वर कोठावळे, विजू भोसले, अंकुश भांडवलकर, अशोक महाराज कोठावळे, रोहिणी वाघमारे आणि विमल आरडे आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी सरपंच बापू आजबे, उपसरपंच रवी कोठावळे, सचिन भवर, माजी सरपंच अजिनाथ जाधव, नानासाहेब आरडे, गणेश शेंडकर, बाळासाहेब शेंडकर, अनिल आरडे, दत्ता भांडवलकर, दीपक गोरे, विलास कांबळे, शहाजी भवर, जालिंदर हिवरे, गणेश भांडवलकर, गणेश शिंदे, राम मुळे, दिगांबर गोंदकर, अजिनाथ भांडवलकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here