Voting : कर्जत-जामखेडमध्ये सरासरी ६५ टक्के मतदान

Voting : कर्जत-जामखेडमध्ये सरासरी ६५ टक्के मतदान

0
Voting
Voting : कर्जत-जामखेडमध्ये सरासरी ६५ टक्के मतदान

Voting : कर्जत: कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) एकूण सरासरी ६५ टक्के मतदान पार पडले असल्याची माहिती कर्जतचे प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली. मतदान (Voting) प्रक्रिया सर्व ठिकाणी शांततेत पार पडले. विविध मतदान केंद्रावर मतदारांनी (Voter) रांगा लावत मतदान केले.

हे देखील वाचा : मुंबईत तुफान वादळ

काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड (Voting)

मतदान प्रक्रिये दरम्यान जामखेडमध्ये ३ तर कर्जतला ३ मतदान केंद्रावर मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट तांत्रिक कारणाने बदलावे लागले.कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात ३५६ मतदान केंद्रावर एकूण ३ लाख ३६ हजार ९०३ मतदारांपैकी २ लाख २१ हजार ७२७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदार १ लाख २२ हजार ७४२ तर महिला ९८ हजार ९८५ मतदारांचा समावेश आहे. ३५६ मतदान केंद्रावर सरासरी ६५.८१ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर जास्तीत-जास्त मतदान करून घेण्यासाठी राजकीय मतदान प्रतिनिधीनी मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय केली होती. चोंडी (ता.जामखेड) येथे विधानपरिषदेचे आमदार तथा माजीमंत्री राम शिंदे यांनी आई आणि पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पहावयास मिळत होती तर दुपारी आणि संध्याकाळी अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा पहावयास मिळाल्या. काही मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांनी स्वीप समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

Voting
Voting : कर्जत-जामखेडमध्ये सरासरी ६५ टक्के मतदान

नक्की वाचा : मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवाराच्या स्लिप; मविआच्या उमेदवाराकडून संपात व्यक्त

मतदान केंद्रांवर उन्हाळ्यामुळे खास व्यवस्था (Voting)

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती मुलूक आणि महेश पाटील यांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. यंदा कडक उन्हाच्या तडाख्यात मतदान होत असून महसूल प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रावर सावलीसाठी मंडप तसेच पिण्याचे पाणी यासह हवा खेळती राहील यासाठी पंखे, कुलरची व्यवस्था केली होती. सर्व मतदान केंद्रावर प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्यासह तहसीलदार गुरू बिराजदार, गणेश माळी, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, मुख्याधिकारी अजय साळवे तसेच ३८ क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी भेटी घेत आढावा घेतला. जामखेड तालुक्यात रत्नापूर दोन मतदान केंद्रावर यासह फाळकेवाडी एक तर कर्जत तालुक्यातील शिंदे, मिरजगाव आणि कर्जत येथील ३ मतदान केंद्रावर मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॉट तांत्रिक कारणाने बदलण्यात आले. तर संध्याकाळी दोन्ही तालुक्यातील काही गावांत वादळी-वाऱ्याने वीज गेली असता मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात प्रशासनास तारेवरची कसरत पार पाडावी लागली.

Voting
Voting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here