Voting : रुग्णालयात उपचार सुरू असतानाही बजावला मतदानाचा हक्क

Voting : रुग्णालयात उपचार सुरू असतानाही बजावला मतदानाचा हक्क

0
Voting
Voting : रुग्णालयात उपचार सुरू असतानाही बजावला मतदानाचा हक्क

Voting : श्रीरामपूर: तालुक्यातील कारेगाव येथील शेतकरी (Farmer) व कृषि उद्योजक बाळासाहेब सखाहरी भवार यांनी रुग्णालयात (Hospital) उपचार घेत असतानाही आपल्या कारेगाव येथे जाऊन मतदानाचा (Voting) हक्क बजावला.

हे देखील वाचा: ‘सगेसोयरेसाठी’ ४ जूनपासून पुन्हा आंदोलन; मनोज जरांगेंनी उपसलं उपोषणाचं हत्यार

डॉक्टरांकडे मतदानासाठी आग्रह

भवार हे गेल्या सहा दिवसांपासून अगोदर संजीवन आणि सध्या राहिंज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी डॉक्टरांकडे मतदानासाठी जाण्याबाबत आग्रह धरला. डॉक्टरांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांनी हॉस्पिटलमधून आहे त्या अवस्थेत श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे त्यांना एका शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले असूनही त्यांनी कोणताही तणाव अथवा मानसिक दडपण न ठेवता अतिशय उत्साहाने मतदान करुन पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. काल त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. भारतीय लोकशाही समृध्द करण्यासाठी संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

नक्की वाचा : मतदान केंद्रावर महायुतीच्या उमेदवाराच्या स्लिप; मविआच्या उमेदवाराकडून संपात व्यक्त

मतदान सहभाग हा सर्वांसाठी अनुकरणीय (Voting)

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणुक आयोग, प्रशासकीय यंत्रणा सर्व आवश्यक प्रयत्न करुन अनेक उपक्रम राबवित आहेत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब भवार यांनी सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने देशभर साजरा होत असलेल्या लोकशाहीच्या उत्सवातील घेतलेला सहभाग हा सर्वांसाठी अनुकरणीय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here