Voting : पारनेर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections) मतदानासाठी (Voting) जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (Voter ID) सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त विविध १२ कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करू शकतात, असे निवडणूक आयोगाने (Election Commission) कळवलं आहे.
नक्की वाचा: मोठी बातमी!शंकरराव गडाख यांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस
ही कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करू शकतील
ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकतील. जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही, असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढील नमूद कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करू शकतील. त्यात आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक, पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र, छायाचित्रासह मतदार ओळखपत्राद्वारे मतदाराची ओळख पटत असेल, तर मतदार ओळखपत्रातील कारकुनी त्रुटी, शब्दलेखनातील चुका आदी किरकोळ विसंगती दुर्लक्षित करावी, मतदाराचे नाव तो ज्या ठिकाणी मतदान करीत आहे, त्या मतदार यादीत आहे, परंतु त्याच्याकडे अन्य विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी यांनी वितरीत केलेले छायाचित्रासह मतदार ओळखपत्र असल्यास ते स्वीकारण्यात येणार आहे.
अवश्य वाचा: ‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; अजित पवार गटाला कोणते चिन्ह मिळणार?
पर्यायी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक (Voting)
छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे ओळख पटवणे शक्य नसल्यास मतदारास वरील पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील. मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा, मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहिती उपलब्ध होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या ८ जून २०२३ रोजीच्या पत्रान्वये मतदारांना फोटो व्होटर स्लीप ऐवजी मतदार माहिती चिठ्ठी वितरीत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या मतदार चिठ्ठीमध्ये मतदान केंद्र, मतदानाची तारीख, वेळ आदी माहिती समाविष्ट असेल. मतदार माहिती चिठ्ठी सर्व मतदारांना मतदानाच्या किमान पाच दिवस अगोदर प्राप्त होईल, असे वितरण करावे. मात्र, मतदारांच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदार माहिती चिठ्ठी ग्राह्य असणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.