Voting : अहिल्यानगर : जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मताचे मूल्य जाणून आपला मतदानाचा (Voting) हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी केले.
नक्की वाचा: मोठी बातमी!बारावीची ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून बोर्डाची परीक्षा
कर्मचाऱ्यांना देण्यात आली मतदानाची शपथ
जिल्हा परिषदेमध्ये ‘वोटर अवेरनेस फोरम’ पथकामार्फत कर्मचाऱ्यांना नैतिक मतदानाची शपथ देण्यात आली. यावेळी श्री. शेळके बोलत होते. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा स्वीप समन्वयक भास्कर पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अवश्य वाचा: ‘एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही’- मनोज जरांगे
श्री. शेळके म्हणाले (Voting)
मतदान जनजागृती उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाद्वारे तर इतर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शिक्षणाधिकारी पाटील यांनी मतदार जागृती मंच संकल्पना व त्याद्वारे आयोजित केलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषद आवारात मतदार जनजागृतीच्या अनेक संकल्पना असलेल्या ‘मतदारनगरी’ कक्षाची पाहणीही उपस्थितांनी यावेळी केली.