Voting : नगर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरात महानगरपालिकेच्या वतीने मतदानाचा (Voting) टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत महानगरपालिकेच्या शहर बस सेवेतील सर्व बस गाड्यांवर पोस्टर लावून जनजागृती करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक शहर बस सेवेचा लाभ घेतात. शहराच्या सर्व भागात बसेसच्या माध्यमातून सेवा दिली जाते. त्यामुळे या बसेसवर पोस्टर लावून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. लोकशाही (Democracy) बळकट करण्यासाठी अहिल्यानगर शहरातील मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
नक्की वाचा: ‘उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही’- चंद्रशेखर बावनकुळे
शहर बस गाड्यांवर पोस्टर लावून अनावरण
आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते शहर बस सेवेतील गाड्यांवर पोस्टर लावून त्याचे अनावरण करण्यात आले. शहरातील बस स्टॉप, कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या आदींवर फलक लावून, जिंगल्स वाजवून मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. मतदारांकडून संकल्पपत्र भरून घेतले जात आहेत. महापालिकेतील देयके, विविध पावत्यांवर वॉटरमार्क द्वारे मतदार जागृतीचा लोगो छापण्यात आला आहे.
अवश्य वाचा: ५० लाखांच्या बिअर बाटल्यासहा ७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
विविध मॉर्निंग ग्रुप मध्ये चर्चासत्र घडवून जनजागृती (Voting)
सोशल मीडियात अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना मतदानासाठी आवाहन केले जात आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम, कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. विविध मॉर्निंग ग्रुप मध्ये चर्चासत्र घडवून आणत वेगळ्या प्रकारे जनजागृती केली जात असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी सांगितले.