Voting : मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी

Voting : मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी

0
Voting

Voting : कर्जत : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत (Lok Sabha Elections) मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये मतदान (Voting) प्रक्रियेविषयी जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा आणि तालुका प्रशासनाच्यावतीने कर्जत शहरात मतदान जनजागृती (Voting awareness) प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी अमरनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मतदान जनजागृती विषयी शपथ देण्यात आली.       

हे देखील वाचा: नगरच्या पहिल्या खासदाराने जनतेसाठी फोडलं होतं सरकारी गोदाम

लोकशाही बळकट करण्यासाठी जागृती

लोकसभा निवडणुकीत मतदारांनी आपले अधिकार निर्भीडपणे बजावत लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग घ्यावा. मतदानाची टक्केवारी वाढावी. लोकशाही बळकट करावी. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकारी कर्जत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील अमरनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती प्रभातफेरी काढली. “जनमनाची पुकार, मतदान आपला अधिकार, मतदानासाठी वेळ काढा. आपली जबाबदारी पार पाडा. यासह सोडा आपले सर्व कामे, चला करूया मतदान आणि मतदानाची ताकद ओळखू या, लोकप्रतिनिधी निवडू या” या घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला होता.

नक्की वाचा: उत्कर्षा रुपवते यांच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात?

मतदान जनजागृती विषयी शपथ (Voting)

विद्यालयातून प्रभातफेरी काढत संपूर्ण कर्जत शहरातून विद्यार्थ्यांनी जनजागृती करीत मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन नागरिकांना केले. बसस्थानक परिसरात तहसीलदार गुरू बिराजदार यांनी प्रभातफेरीचे स्वागत करीत सहभागी झाले होते. याप्रसंगी विद्यालयाने मतदान जनजागृती विषयक घेण्यात आलेल्या घोषवाक्य, चित्रकला, रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मतदान जनजागृती विषयी शपथ देण्यात आली. यावेळी स्वीप कमिटीचे नोडल अधिकारी उज्वला गायकवाड, अंकुश झिंजे, किरण कोल्हे यांच्यासह अमरनाथ विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आदी सहभागी झाले होते. प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here