Voting : नगर : विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मतदानाची (Voting) टक्केवारी वाढावी, यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी आणि त्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Dr. Praveen Gedam) यांनी दिल्या.
नक्की वाचा: ‘उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही’- चंद्रशेखर बावनकुळे
मतदार जनजागृती संदर्भातील उपक्रमांचा आढावा
स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून पाचही जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती संदर्भातील उपक्रमांचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. पाचही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, स्विपचे नोडल अधिकारी आदींची यावेळी उपस्थिती होती.
अवश्य वाचा: ५० लाखांच्या बिअर बाटल्यासहा ७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती (Voting)
तसेच विभागीय आयुक्तालय येथे उपायुक्त सुभाष बोरकर, तहसीलदार पल्लवी जगताप, नगरपालिका प्रशासन शाखेचे उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे उपस्थित होते. यावेळी पाचही जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.