Voting : गावरान बियाण्यांनी साकारली लोकशाहीची रांगोळी

Voting : गावरान बियाण्यांनी साकारली लोकशाहीची रांगोळी

0
Voting : गावरान बियाण्यांनी साकारली लोकशाहीची रांगोळी
Voting : गावरान बियाण्यांनी साकारली लोकशाहीची रांगोळी

Voting : अकोले : तालुक्यातील देवगाव येथील ममताबाई व जिजाबाई भांगरे यांनी गावरान बियाण्यांचा वापर करत मतदार जागृतीसाठी (Voter Awareness) अनोख्या रांगोळ्या साकारल्या आहेत. या रांगोळ्यांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश, मतदान (Voting) यंत्र, निवडणूक आयोगाचे (Election Commission) चिन्ह आणि मतदानाची तारीख यांचे देखणे चित्रण करण्यात आले आहे. या कल्पकतेतून, ग्रामीण महिलांना व नवमतदारांना 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नक्की वाचा : काश्मीरमधील बनावट शस्त्र परवाना देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

ग्रामीण भागातील महिलांशी साधला संवाद


अकोल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव, सहाय्यक अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप समन्वयक अधिकारी सविता कचरे मतदान जनजागृतींसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत आहेत. बायफ संस्थेच्या मदतीने ममताबाई भांगरे गेल्या 15 वर्षांपासून अन्नमाता म्हणून ग्रामीण भागातील महिलांशी संवाद साधत आहेत.

अवश्य वाचा : गृह मतदानासाठी गेलेल्या मतदान पथकाचे अनोखे स्वागत

मतदानाचे महत्त्व दिले पटवून (Voting)

भातशेतीच्या कामात व्यस्त असलेल्या महिलांना त्यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले आहे. या अनोख्या उपक्रमाद्वारे त्यांनी महिलांना व नवमतदारांना ‘हातातील कामे थांबवा आणि मतदानाला चला’ असे आवाहन केले आहे. मतदान हा लोकशाहीचा आत्मा असल्याचे स्पष्ट करत त्यांनी गावरान बियाण्यांच्या रांगोळीतून जनतेला लोकशाहीच्या प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.