Voting : नगर : विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान (Voting) होणार असून मतदान केंद्रासाठी (Polling Center) नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांची तिसरी आणि अंतिम सरमिसळ जिल्हाधिकारी (District Collector) सिद्धाराम सालीमठ आणि निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आली.
नक्की वाचा : ‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’,कालीचरण महाराजांची जरांगेंवर खोचक टीका
पथकांना मतदान केंद्र करून देण्यात आले निश्चित
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या सरमिसळ प्रक्रियेस निवडणूक निरीक्षक ताई के, हौलीनलाल गौईटे, अरुण कुमार, डी. रथ्ना, कविथा रामू, श्रीमती रंजीता, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, मनुष्यबळ समन्वयक अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी जी. एन.नकासकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाकरिता होणाऱ्या मतदानाकरिता मतदान केंद्र कर्मचाऱ्यांचे २७ ऑक्टोबर रोजी प्रथम प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले होते. १ नोव्हेंबर रोजी या सर्व कर्मचाऱ्यांची दुसरी सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली. यात मतदान पथक निश्चित करण्यात आले, आजच्या सरमिसळ प्रक्रियेद्वारे या पथकांना मतदान केंद्र निश्चित करून देण्यात आले.
अवश्य वाचा : ‘वाकडी टिकली लावलेले स्वतःला धर्माचे रक्षक मानतात’- मनोज जरांगे
३ हजार ७६५ मतदान केंद्रासाठी पथक निश्चित (Voting)
मनुष्यबळाची सरमिसळ करून ३ हजार ७६५ मतदान केंद्रासाठी पथक निश्चित करण्यात आले. यात अकोले विधानसभा मतदारसंघासाठी ३०७, कर्जत जामखेड मतदासंघांसाठी ३५६, श्रीगोंदा ३४५, अहमदनगर शहर २९७, पारनेर ३६६, राहुरी ३०८, शेवगाव ३६८, कोपरगाव २७२, नेवासा २७६, संगमनेर २८८, शिर्डी २७१, आणि श्रीरामपूर मतदासंघातील ३११ मतदान केंद्रासाठी पथक निश्चित करण्यात आले. प्रत्येक मतदासंघात १० टक्के अतिरिक्त पथक ठेवण्यात आले आहेत. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे श्री.नकासकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आली.