Voting : मतदान प्रक्रियेवर प्रशासनाची करडी नजर

Voting : मतदान प्रक्रियेवर प्रशासनाची करडी नजर

0
Voting : मतदान प्रक्रियेवर प्रशासनाची करडी नजर
Voting : मतदान प्रक्रियेवर प्रशासनाची करडी नजर

Voting : नगर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक (Assembly Elections) २०२४ साठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात बुधवार ता. २० नोव्हेंबर रोजी मतदानाची (Voting) प्रक्रिया पार पडत आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर जिल्हाधिकारी कार्यालयात (District Collector’s Office) स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून (Control Room) बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ या यंत्रणेद्वारे स्वत: नियंत्रण कक्षातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत.

नक्की वाचा : ‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’,कालीचरण महाराजांची जरांगेंवर खोचक टीका

५० % मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सूचना

अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील ३ हजार ७६५ मतदान केंद्रातून मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदान केंद्रापैकी ५० टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टींग करण्याच्या निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. शहरी भागातील सर्व मतदान केंद्रातून मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. त्यानुसार २ हजार ८५ मतदान केंद्रांवर ही सुविधा करण्यात आली आहे.

अवश्य वाचा : ‘वाकडी टिकली लावलेले स्वतःला धर्माचे रक्षक मानतात’- मनोज जरांगे

प्रत्येक मतदार संघासाठी एक अशा एकूण १२ स्क्रीन (Voting)

मतदान केंद्रांवर लावलेल्या कॅमेऱ्याद्वारे तेथील प्रत्येक हालचाली टिपल्या जातील. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन नियंत्रण कक्षात प्रत्येक मतदार संघासाठी एक अशा एकूण १२ स्क्रीन लावण्यात आल्या असून या ठिकाणी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. या स्क्रीनवर २ हजार ८५ मतदान केंद्रांपैकी कोणत्याही केंद्रावरील मतदान प्रक्रिया पाहाता येईल.

वेबकास्टिंग यंत्रणेमुळे मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदान व्हावे यादृष्टीने चांगले नियंत्रण ठेवता येईल. तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी आल्यास त्वरीत जिल्हा नियंत्रण कक्षाद्वारे संपर्क साधता येणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे आणि शांततेत पार पाडण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. वेबकास्टिंगमुळे मतदान प्रक्रियेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये यादृष्टीने चांगले नियंत्रण स्थापित करता येणार आहे.