Voting : नगर : अहिल्यानगर शहरातील मतदारांमध्ये जनजागृतीसाठी (Voter Awareness) महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. अहमदनगर विधानसभा मतदारसंघात मागील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा (Assembly Elections) यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा (Voting) टक्का वाढला आहे. तसेच, महानगरपालिकेमार्फत झालेली आदर्श मतदान केंद्रांची उभारणी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हील चेअर, पाणी व इतर सुविधांमुळे मतदारांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
नक्की वाचा : मतदान प्रक्रियेवर प्रशासनाची करडी नजर
100% मतदानाचा संकल्प करणारी शपथ
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत अहिल्यानगर शहरात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबविण्यात आले. शहरातील विविध घटकातील नागरिक, संघटना, दिव्यांग बांधव, तृतीयपंथी आदींमध्ये जनजागृती करून शंभर टक्के मतदानाचा संकल्प करणारी शपथ सर्वांना दिली.
अवश्य वाचा : यश शाहची तिसऱ्यांदा खेलो इंडिया व ऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड
विविध उपक्रमांमधून जनजागृती (Voting)
महानगरपालिकेच्या बस सेवा देणाऱ्या बसेस, बस स्टॉप, कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या आदींवर फलक लावून, जिंगल्स वाजवून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. मतदारांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात आले. महानगरपालिकेतील देयके, विविध पावत्यांवर वॉटरमार्क द्वारे मतदार जागृतीचा लोगो छापण्यात आला. सोशल मीडियात अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना मतदानासाठी आवाहन केले. शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम, कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली. विविध मॉर्निंग ग्रुप मध्ये चर्चासत्र घडवून आणत वेगळ्या प्रकारे जनजागृती करण्यात आली. बाईक रॅलीद्वारे संपूर्ण शहरात मतदान करण्याचा संदेश देण्यात आला होता.