Voting : निर्भीड मतदान देशाची लोकशाही घडवते : तहसीलदार

Voting : निर्भीड मतदान देशाची लोकशाही घडवते : तहसीलदार

0
Voting : निर्भीड मतदान देशाची लोकशाही घडवते : तहसीलदार
Voting : निर्भीड मतदान देशाची लोकशाही घडवते : तहसीलदार

Voting : कर्जत : महाविद्यालयातील विद्यार्थी हा भविष्यातील जागरूक मतदार (Voters) असणार असून तरुण मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याने देशाचे भविष्य तरुणांच्या हाती असल्याचे दिसते. भयमुक्त वातावरणात आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान (Voting) करून देशाचे सार्वभौमत्त्व अबाधित राखावे, असे आवाहन कर्जतचे तहसीलदार (Tehsildar) गुरू बिराजदार यांनी केले.

Voting : निर्भीड मतदान देशाची लोकशाही घडवते : तहसीलदार
Voting : निर्भीड मतदान देशाची लोकशाही घडवते : तहसीलदार

नक्की वाचा : मोठी बातमी!लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात

राष्ट्रीय मतदार दिन विविध उपक्रमांनी साजरा

ते कर्जत निवडणूक विभाग आणि दादा पाटील महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त बोलत होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ देण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. संजय नगरकर उपस्थित होते. २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस दादा पाटील महाविद्यालय व तहसील कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. लोकशाही प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग वाढवणे, मतदानाचे महत्त्व विशद करणे, विशेषतः तरुण मतदारांना प्रोत्साहन देणे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या दिवशी विविध शाळा, महाविद्यालयात आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दादा पाटील महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘मजबूत लोकशाहीसाठी मतदान करा’ या ब्रीदवाक्याला अनुसरून जनजागृतीपर पथनाट्य सादर करून विद्यार्थी मतदारांना प्रबोधनपर संदेश दिला. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले की, सर्वसामान्य मतदार हा देशाचा राजा ठरवू लागला आहे. आजचा राजा मतपेटीतून जन्माला येत आहे. देशाचे भविष्य व भवितव्य हे तरुणांच्या हातात आहे. जगातील अनेक क्रांत्या ह्या तरुणांनीच घडवलेल्या आहेत. तरुण सजग असला की देशसुद्धा जागृत ठरतो.

Voting : निर्भीड मतदान देशाची लोकशाही घडवते : तहसीलदार
Voting : निर्भीड मतदान देशाची लोकशाही घडवते : तहसीलदार

अवश्य वाचा : शहरातील सर्व खासगी रुग्णालयांची महापालिकेकडून होणार तपासणी

उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ (Voting)

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ दिली. फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून निवड झाल्याबद्दल रसायनशास्र विभागाचा संकेत सूर्यवंशी, गांधी विचार संस्कार परीक्षेत नेहा नवनाथ आटोळे व शिवानी परमेश्वर घोगरे या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन एनसीसी विभाग प्रमुख मेजर डॉ. संजय चौधरी, एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलास रोडगे, महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर डॉ. दत्तात्रय शेंडे यांनी केले होते.