Voting : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद २०२५ साठी ३ एप्रिल रोजी मतदान

Voting : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद २०२५ साठी ३ एप्रिल रोजी मतदान

0
Voting : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद २०२५ साठी ३ एप्रिल रोजी मतदानVoting : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद २०२५ साठी ३ एप्रिल रोजी मतदानVoting : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद २०२५ साठी ३ एप्रिल रोजी मतदान
Voting : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद २०२५ साठी ३ एप्रिल रोजी मतदान

Voting : नगर : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (Maharashtra Medical Council) साठी गुरुवार ३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान (Voting) घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी नोंदणी असलेल्या सर्व पात्र मतदारांनी (Voter) निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत (District Administration) करण्यात आले आहे.

नक्की वाचा : बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित;विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची घोषणा

१७ जानेवारी २०२५ रोजी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नियमावलीनूसार महाराष्ट्र राज्य दंत परिषद मुंबईच्या निबंधक तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी शिल्पा किरण परब यांनी १७ जानेवारी २०२५ रोजी निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा समन्वयक म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगरचे प्रा. डॉ. बी.आर. सोनवणे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

अवश्य वाचा : माध्यमिक शिक्षक सोसायटीत ‘परिवर्तन’

२ हजार ६२५ मतदारांची संख्या निश्चित (Voting)

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी ४१ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यापैकी ९ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत वैद्यकशास्त्रातील वैद्यकीय व्यावसायिक हे मतदार असून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एकूण २ हजार ६२५ मतदारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.


जिल्हास्तरावर आनंद विद्यालय, गुलमोहर रोड, सावेडी येथे ४ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने १ क्षेत्रीय अधिकारी, वर्ग-२ दर्जाचे ५ मतदान केंद्राध्यक्ष, वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांची मतदान अधिकारी व कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व शिपाई अशा एकूण २८ अधिकारी, कर्मचाऱ्यांची या निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे.


निवडणुकीसाठी नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आज पहिले तर २ एप्रिल २०२५ रोजी दुसऱ्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. २ एप्रिल रोजी मतदान साहित्याचे वाटपही करण्यात येऊन मतदान पथके मतदान केंद्राकडे रवाना करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून निवडणुकीसाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असल्याचेही कळविण्यात आले आहे.