Voting : नगर : जेवढा तरूण पिढीचा सहभाग, तेवढी लोकशाही (Democracy) बळकट असे मानले जाते. त्यामुळेच २८ मार्च १९८८ रोजी ६१वी घटना दुरुस्ती करून मतदानाच्या (Voting) अधिकाराचे वय २१ वरून १८ वर्षे करण्यात आले. त्यामुळे मतदारांच्या (Voter) संख्येत खूप मोठी वाढ झाली. यंदा नगर जिल्ह्यात एकूण ६८ हजार ९५० मतदार वाढले आहे. दरम्यान प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार एकूण मतदारांची संख्या ३६ लाख ११ हजार ३३ झाली आहे.
हे देखील वाचा: ज्यांनी दादांची साथ सोडली, ते जनतेची साथ काय देणार; राधाकृष्ण विखेंची लंकेंवर टीका
तरुण मतदारांना आकर्षीत करण्यासाठी निर्णय (Voting)
दरम्यान, देशात १९८०च्या दशकात दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांमध्ये दाेन ते अडीच कोटींची वाढ होत असे. पण नव्या निर्णयामुळे ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. १९८४ सालच्या निवडणुकीत मतदारांची संख्या ३७.४ कोटी इतकी होती. १९८९च्या निवडणुकीत ही संख्या ४४.७ कोटी इतकी झाली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात काँग्रेस पक्षाबाबत मोठी सहानुभूती निर्माण झाली होती. याचं फलित म्हणजे त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसला ऐतिहासिक बहुमत मिळालं. एकूण ४०४ जागा एकट्या काँग्रेस पक्षाने जिंकल्या. राजीव गांधी हे वयाच्या चाळीशीत म्हणजेच सर्वांत कमी वयात पंतप्रधान पदाची शपथ घेणारे पहिले पंतप्रधान आहेत. स्वत: तरूण असल्यामुळे आपण काँग्रेसकडे तरूण मतदारांना अधिकाधिक आकर्षित करू शकतो, असा विश्वास त्यांना वाटला होता. त्यामुळे त्यांनी २८ मार्च १९८८ रोजी संसदेत एक विधेयक संमत करून घेतले. नव्याने संमत झालेल्या विधेयकानुसार मतदानाच्या अधिकाराचे किमान वय २१ वरून १८ वर्षे करण्यात आले. पण प्रत्यक्षात काँग्रेसचा हेतू साध्य झाला नाही. मतदानाचे वय कमी केल्यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा या तरूण मतदारांनी काँग्रेसच्या विरोधात कौल दिला. तरूण वर्गाच्या गरजा मोठ्या असतात. शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य, रोजगार हे त्यांचे महत्त्वाचे प्रश्न असतात. त्यामुळे या प्रश्नांना राजकारणात फार महत्त्व दिले जाते. मात्र, त्याचे फलित निवडणुकीत दिसत नव्हते.
नक्की वाचा: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार; हायकाेर्टाचे मुदतपूर्व सुटकेचे निर्देश
तरुण मतदारांचा निरुत्साह (Voting)
आज आपल्याकडील राजकीय स्थितीचा विचार करता तरूण मतदार मतदानासाठी फारसा उत्सुक नाही. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यास बाहेरगावी जाण्याकडे काहींचा कल असतो. अनेक तरूण मतदार शिक्षण आणि रोजगाराच्या निमित्ताने बाहेरगावी असतात, अशा मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. त्यामुळे मतदानाचे वय कमी करून खरंच उपयोग झाला का प्रश्न महत्त्वाचा ठरतो.