Voting : मनपा स्वीप समितीच्या वतीने ‘सिटी वोट फेस्टिवल’; मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध स्पर्धांचे आयाेजन

Voting : मनपा स्वीप समितीच्या वतीने "सिटी वोट फेस्टिवल"; मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध स्पर्धांचा समावेश

0
Voting : मनपा स्वीप समितीच्या वतीने
Voting : मनपा स्वीप समितीच्या वतीने "सिटी वोट फेस्टिवल"; मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध स्पर्धांचा समावेश

Voting : नगर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक (Ahilyanagar Municipal Corporation Election) २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर स्वीप समितीच्या माध्यमातून मनपा हद्दीतील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी ८ ते १४ जानेवारी २०२६ दरम्यान ‘सिटी वोट फेस्टिवल’ (City Vote Festival) या मतदार जनजागृती सप्ताहाचे (Voter Awareness Week) आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध प्रकारच्या स्पर्धा व उपक्रमांचा समावेश असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त तथा स्वीप नोडल अधिकारी अशोक साबळे यांनी दिली.

निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व स्पर्धांसाठी ‘मतदार जनजागृती’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे बिबट्या जेरबंद

सप्ताहातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असतील : (Voting)

​८ जानेवारी रोजी भाषण स्पर्धा, ९ जानेवारी रोजी आई-वडिलांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याबाबत शपथ व संकल्पपत्र, १० जानेवारी रोजी ‘संक्रांती मतदार जनजागृतीपर शुभेच्छापत्र (ग्रीटिंग) बनवा’ स्पर्धा, ११ जानेवारी रोजी पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ऑनलाइन मतदार जनजागृती संदेश/इमेजेस/व्हिडिओचे वितरण, १२ जानेवारी रोजी महिला पालकांसाठी (मातांसाठी) मतदार जनजागृतीपर हळदी-कुंकू मेळावा, १३ जानेवारी रोजी शालेय परिसरातून प्रभात फेरी/शोभायात्रा/मतदार रॅली आणि १४ जानेवारी २०२६ रोजी ऑनलाइन मतदार जनजागृतीपर सामुहिक व्हॉट्सॲप संदेशांचे वितरण इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत.

नक्की वाचा: प्रभाग 12 मध्ये मातब्बर उमेदवारांसमोर शुभ्रा तांबोळी आणि अमोल निस्ताने यांचे तगडे आव्हान

फोटो, व्हिडिओ ८०५५८ ०९३९४ या क्रमांकावर पाठवावे(Voting)

​या सर्व स्पर्धांसाठी पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे तीन गट आहेत. शालेय पातळीवर स्पर्धा घेऊन प्रथम तीन क्रमांक काढण्यात यावेत. तसेच स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे मतदान संकल्पपत्र, भेटकार्ड व इतर लेखन साहित्य १७ जानेवारी २०२६ पर्यंत “स्वीपनगरी”, तळमजला, महानगरपालिका नूतन प्रशासकीय इमारत, छत्रपती संभाजीनगर रोड, अहिल्यानगर येथे पाठवावे. तसेच उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ व वृत्तपत्रातील बातम्या आदी साहित्य ८०५५८ ०९३९४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावे. सहभागी शाळा व कृतिशील शिक्षकांना सन्मानपत्र आणि विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. शालेय पातळीवर विविध उपक्रम राबवताना आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : महापालिकेचं रणांगण तापलं! महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस अहिल्यानगरच्या मैदानात

​जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन १०० टक्के मतदान करण्यासाठी आपल्या पालकांना प्रवृत्त करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, मतदारदूत डॉ. अमोल बागुल, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे व प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी केले आहे.