Voting : पाथर्डी : मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाथर्डी तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ढाकणवाडी गावाने मतदानावर बहिष्कार (Voting boycott) टाकला होता. त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही म्हणून खबरदारीसाठी जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. वडगाव गावासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र स्वरूपाचा पवित्रा घेऊन मतदानावर (Voting) शंभर टक्के बहिष्कार टाकून एकाही मतदाराने मतदान केले नव्हते. मागील निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू नये, आपला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल आहे. सर्वांनी मतदान करून शंभर टक्के मतदान करून आपला हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करा, असे आवाहन देखील करण्यात आले.
हे देखील वाचा: अजय महाराज बारस्कर यांचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप
गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, प्रांतधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी ढाकणवाडी गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी उपसरपंच रवींद्र ढाकणे, दत्तू ढाकणे, रावसाहेब ढाकणे, सोमा बडे, पंचायत समितीचे अभियंता अनिल सानप, ग्रामसेवक रोहिदास आघाव, तलाठी मनोज खेडकर उपस्थित होते.
नक्की वाचा : अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषक हरला; उद्धव ठाकरे यांचा पलटवार
मत परिवर्तन करण्यामध्ये प्रशासनाला यश (Voting)
ग्रामस्थांचे मत परिवर्तन करण्यामध्ये प्रशासनाला यश आले असून या निवडणुकीत आम्ही मतदान करू, असे मतदार व ग्रामस्थांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आश्वासित केले. त्यानंतर पाथर्डी तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती बिकट चालली असून मोठ्या प्रमाणात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, त्याच्याही परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेऊन तालुक्यात ज्या ठिकाणी पाण्याचे उद्भव आहेत, त्या ठिकाणाहून टँकर भरण्यासंदर्भात काही सूचना तालुका प्रशासनाला दिल्या.