Voting : मतदानावर बहिष्कार टाकायला आले अन मतदानाची शपथ घेऊन गेले

Voting : मतदानावर बहिष्कार टाकायला आले अन मतदानाची शपथ घेऊन गेले

0
Voting
Voting : मतदानावर बहिष्कार टाकायला आले अन मतदानाची शपथ घेऊन गेले

Voting : श्रीरामपूर : वर्तमान एकात्मता फाउंडेशन संचालित कष्टकरी कामगार एकता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली अनुदानित जिल्हा परिषद स्वराज्य संस्थेच्या शाळेत विद्यार्थ्यांना आहार शिजवून खाऊ घालणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Elections) मतदान (Voting) न करण्याचा निर्णय घेतला होता. या आशयाचे निवेदन संघटनेच्या वतीने श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना देण्यात आले होते. याविषयी आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा करण्यासाठी गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी यांच्या माध्यमातून सोमवारी (ता.२९) प्रांताधिकारी सावंत पाटील यांच्या कार्यालयात बैठक आयोजित केली होती.

नक्की वाचा: ‘देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात तो सत्तेचा गैरवापर’-रोहित पवार

बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन (Voting)

यावेळी कष्टकरी कामगार एकता संघाचे अध्यक्ष शरद लोहकरे यांनी स्वयंपाकी व मदतनीस यांच्या समस्यांचा पाढा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्यासमोर मांडत, गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी व शासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, या कष्टकऱ्यांच्या मागणीला लोकप्रतिनिधींनी कोणतीही दखल न घेता शासनाने मागणीला केराची टोपली दाखवली, असे सांगितले. याप्रसंगी प्रांताधिकारी सावंत पाटील यांनी उत्तर देताना सांगितले कि, लोकशाही मार्गाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी मतदानावर बहिष्कार टाकणे ही बाब योग्य नाही. उलट आपण तुमच्या मागण्या शासन दरबारी पाठपुरावा करून पूर्ण करेल, असा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी १०० टक्के मतदान करावे व मतदानावरील बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहन केले.

हे देखील वाचा: नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार

आवाहनाला प्रतिसाद देत बहिष्कार मागे (Voting)

आपल्या मागण्या जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे पाठवीत आहे असे सांगितले. या आवाहनाला प्रतिसाद देताना संघटनेच्या वतीने मतदानावरील बहिष्कार मागे घेत असल्याचे मान्य केले. त्यानंतर प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, निवडणूक नायब तहसीलदार हेमलता वाकडे, गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी, मयुरी थावरे-पिंगळे यांच्या उपस्थितीत स्वीप नोडल अधिकारी गणेश पिंगळे यांनी आंदोलनकर्त्यांना आगामी निवडणुकांत १०० टक्के मतदान करण्याची शपथ दिली. याप्रसंगी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here