Voting : राहाता : रस्ता दुरुस्तीबाबत आचारसंहिता (Code of Conduct) संपल्यानंतर कायदेशीर बाबी तपासून रस्त्याबाबत निर्णय घेऊ. तसेच रस्त्याच्या कडेला पथदिवे व नागरिकांना येणाऱ्या अडचणी तत्काळ दूर करू, अशी सकारात्मक चर्चा मुख्याधिकारी वैभव लोंढे व नागरिकांमध्ये झाल्यानंतर मतदान (Voting) करण्याबाबत मुख्याधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी मतदानावर बहिष्कार (Boycott) टाकण्याचा निर्णय तूर्त मागे घेतला.
हे देखील वाचा: ११ वर्षांनंतर दाभोळकर प्रकरणाचा निकाल; दोन आरोपींना जन्मठेप, तर तिघे निर्दोष
मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन दिले होते (Voting)
चाणखणबाबा ते एकरूखे शिव रस्त्याची अनेक वर्षापासून झालेली दुरावस्था रस्त्याच्या कडेला पथदिवे व नागरिकांच्या पिण्याचा पाणी प्रश्न याबाबत नगर परिषदेला अनेकदा निवेदन देऊ नये कुठलीही कारवाई केली जात नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर तसेच मुख्याधिकारी वैभव लोंढे यांना १३ मे रोजी होणाऱ्या शिर्डी लोकसभा निवडणुकीत नागरिक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन दिले होते. त्यानंतर ८ मे बुधवार रोजी वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध होताच मुख्याधिकारी लोंढे यांनी गुरुवारी (ता.९) या परिसरातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले. यावेळी नागरिकांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून चाणखणबाबा ते एकरूखे शिव रस्त्याची अत्यंत वाईट दुरावस्था झाली आहे. या रस्त्याचे काही प्रमाणातच काम झाले. मात्र, काही प्रमाणात काम बाकी असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी नागरिकांना पावसाळ्यात या रस्त्यावरून जाण्या येण्यासाठी मोठा त्रास होतो.
नक्की वाचा: बहुरुपी उमेदवारावर विश्वास ठेवू नका, अन्यथा पस्तावा करण्याची वेळ : धनंजय मुंडे
मुख्याधिकाऱ्यांच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद (Voting)
नगरपरिषदेला अनेकदा अर्ज करून देखील या रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. या रस्त्याच्या कडेला पथदिवे नाही तसेच नागरिकांना पिण्याची पाणी व्यवस्था नाही. नियमित कर भरून देखील नगरपरिषद नागरिकांना कुठलेही प्रकारची मूलभूत सुविधा देत नसल्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मुख्याधिकारी लोंढे यांनी नागरिकांची समस्या जाणून घेऊन आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ या रस्त्याची कायदेशीरबाबी तपासून लवकरात लवकर नागरिकांना रस्ता दुरुस्त करून देण्याबाबत कारवाई करू तसेच रस्त्याच्या कडेला पथदिवे व इतर नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत नागरिकांची सकारात्मक चर्चा करून मतदानावर बहिष्कार टाकू नका प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन केले. मुख्याधिकारी यांनी नागरिकांच्या समस्येला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर नागरिकांनी तूर्त मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला. यावेळी अॅड. भाऊसाहेब सदाफळ, संभाजी सदाफळ, अॅड. दत्तात्रेय मुरादे, गोरख लांडगे, बाबासाहेब लांडगे, आप्पासाहेब लांडगे, गोरख सदाफळ, सोमनाथ लांडगे, ज्ञानेश्वर सदाफळ, भाऊसाहेब सदाफळ, विजय सदाफळ, किरण लांडगे, देवेंद्र सदाफळ, रंगनाथ सदाफळ आदी नागरिक उपस्थित होते.