wachan sankalp maharashtra : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांर्तगत संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शन

wachan sankalp maharashtra : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमांर्तगत संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शन

0

wachan sankalp maharashtra : अहिल्यानगर : विद्यार्थ्यांना पुस्तके (Books) आणि वाचनाकडे (Reading) आकर्षित करण्यासाठी १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ (wachan sankalp maharashtra) हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यात सामूहिक वाचन, वाचन संवाद, वाचन कौशल्य कार्यशाळा, पुस्तक परीक्षण आणि कथाकथन स्पर्धा असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी रा. दा. शिंदे यांनीं दिली.

नक्की वाचा : चोराचा शोध घेण्यासाठी बस थेट पोलीस ठाण्यात

उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्याद्वारे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाबाबतच्या मार्गदर्शक सूचना आणि कार्यपद्धती देण्यात आली आहे. राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमा व्यतिरिक्त अन्य कोणतेही पुस्तक वाचायचे आहे. या पुस्तकावर किमान ५०० शब्दांचे परीक्षण किंवा पाच मिनिटांचे सादरीकरण करायचे आहे. वाचनीय पुस्तकांची यादी प्रसिद्ध करून उच्च शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यायची आहेत. स्पर्धेतील विजेत्या परीक्षणांचा समावेश महाविद्यालयाच्या वार्षिक अंकात करावा, स्पर्धेतील विजेत्यांना २६ जानेवारी रोजी पारितोषिके प्रदान करावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अवश्य वाचा : भारतातील अर्थक्रांतीचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

३० विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन (wachan sankalp maharashtra)

राज्यातील दहा विभागांतील प्रत्येकी सर्वोत्कृष्ट तीन विद्याथ्यांची निवड करून एकूण ३० विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येईल, असे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले. ‘उपक्रमासाठी राज्यस्तरीय समिती, विभागस्तरीय समिती, जिल्हास्तरीय समिती, महाविद्यालयीनस्तरीय समिती नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

wachan sankalp maharashtra : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमांर्तगत संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शन
wachan sankalp maharashtra : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांर्तगत संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शन

तसेच वाचन पंधरवड्यानिमित्त, शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथ प्रदर्शन, सामूहिक वाचन, वाचन संवाद, वाचन कौशल्य कार्यशाळा, पुस्तक परीक्षण आणि कथाकथन स्पर्धा असे उपक्रम आयोजित करावे. या कालावधीत नजीकच्या कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयाशी सपंर्क साधून अधिकाधिक विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी करावी, असे अवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

wachan sankalp maharashtra : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' उपक्रमांर्तगत संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शन
wachan sankalp maharashtra : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमांर्तगत संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शन

या उपक्रमाचा भाग एक भाग म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय त्रिवेणी कोर्ट कॉलनी पंपीग स्टेशन रोड, महालक्ष्मी उद्यानाजवळ ,भुतकरवाडी सावेडी,अहिल्यानगर येथे दि.30 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.00 ते सायं 6.00 या वेळेत (शासकीय सुट्या वगळून ) संदर्भ ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सहसचिव श्री. जयंतराव वाघ यांच्या हस्ते व जिल्हा माहिती अधिकारी डॉ. ‍ किरण माघे , मसपचे अध्यक्ष किशोर मरकड यांच्या प्रमुख उपस्तीत 30 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वा. संपन्न होणार आहे.

या प्रदर्शनात मराठी विश्व कोश , मराठी साहित्य कोश , संक्षिप्त मराठी वाड्मयकोश, भूगोल कोश, स्वातंत्र सैनिक कोश, देशभक्त कोश मराठी शब्द रत्नाकर , मराठी परीभाषा कोश , भारतीय संस्कृती कोश , देवी कोश , अहमदनगर गॅजेट , आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार कोश, अहिल्यानगर ‍ साहित्यिक वैभव – साहित्यिक व साहित्य सूची, मराठी ग्रंथसुची, महाराष्ट्र वार्षिकी, इयर बुक , शब्द कोश, इत्यादी 200 च्या वर संदर्भ ग्रंथ या प्रदर्शनात रसिक वाचकांना विनामुल्य पाहता व हाताळता येणार आहे. तरी महाविदयालयीन विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक साहित्यिक, नागरीक यांनी या प्रदर्शनाचा आवश्यक लाभ घ्यावा असे अवाहन ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे यांनी केले आहे.