नगर : भारतीय क्रिकेट चाहते आणि मुंबईचं वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium Mumbai) यांच एक अतुट नाते आहे. मात्र हे मैदान तयार होण्यामागे खूपच रंजक इतिहास (Dye history) आहे. एका मराठी माणसाचा अपमान (Insult to Marathi people) झाला आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियम तयार झालं आहे. जाणून घ्या…
नक्की वाचा: मी कट्टर बीजेपी;अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं गंधार गौरव पुरस्कार सोहळ्यात वक्तव्य
वानखेडे स्टेडियम तयार कसे झाले ? (Wankhede Stadium Mumbai)
ही गोष्ट आहे १९७३ ची. त्यावेळी विदर्भाचे ज्येष्ठ नेते शेषराव वानखेडे हे विधानसभा अध्यक्ष होते. तेव्हा राज्यातील काही युवा आमदार त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी कामाच्या तणावातून आराम मिळावा, यासाठी आमदार आणि मंत्र्यांमध्ये क्रिकेट सामना खेळवावा, अशी मागणी केली. वानखेडे यांना ही आयडिया आवडली आणि त्यांनी ही मागणी मान्य केली. त्यावेळी मुंबईत आधीच ब्रेबॉर्न स्टेडियम होते.

हे मैदान क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्या मालकीचे होते. पण त्यावेळी सीसीआय आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशन यांच्यात मैदानातील राखीव जागांवरून वाद सुरू होता.मग अश्या पस्थितीत CCI आपल्याला मैदान देणार का? असा प्रश्न वानखेडेंच्या मनात आला, पण मंत्री आणि आमदारांची मॅच म्हटल्यावर ते मैदान देतील,असा विश्वास त्यांना होता. त्यामुळे ब्रेबॉर्न स्टेडियमची मागणी करण्यासाठी ते काही आमदारांना घेऊन दिग्गज क्रिकेटपटू विजय मर्चंट यांच्याकडे गेले. मर्चंट हे त्याकाळी CCI चे अध्यक्ष होते.
अवश्य वाचा: काँग्रेस आणि मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागल्याने आपण लांबून हसणं बरं;मंत्री नितेश राणेंची टीका
शेषराव वानखेडे आणि मर्चंट यांच्यात शाब्दिक वाद (Wankhede Stadium Mumbai)
वानखेडेंनी मैदानाची मागणी करताच मर्चंट यांनी मैदान देण्यासाठी स्पष्ट शब्दांत नकार दिला. या चर्चेदरम्यान शेषराव वानखेडे आणि मर्चंट यांच्यात शाब्दिक वादही झाला. या वादात, वानखेडे यांनी आम्ही मुंबईत आमच्या मालकीचे स्टेडियम बांधून दाखवू, असं ठामपणे सांगितलं. मात्र यावेळी तुम्ही घाटी लोक काय स्टेडियम बांधणार? असं म्हणत विजय मर्चंड यांनी त्यांचा अपमान केला. या अपमानानंतर वानखेडे हे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना झालेला प्रकार सांगितला. तसेच, त्यांच्याकडे नव्या क्रिकेट स्टेडियमची मागणी केली. पण त्याकाळी अशी मागणी करणे अतिशयोक्तीचे होते. तसेच, मैदानासाठी प्रचंड पैशांची आवश्यकता होती. शिवाय मुंबईत आधीच एक स्टेडियम होते. यामुळे मुख्यमंत्र्यांनी यासाठी नकार दिला. यानंतर वानखेडे म्हणाले, तुम्ही फक्त आम्ही सांगतो ती जागा द्या,पैशांचा बंदोबस्त आम्ही करू.”
मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अनेक प्रयत्न करून वानखेडे यांनी मागितलेली जागा त्यांना क्रिकेट मैदानासाठी दिली. यानंतर वानखेडे यांनी अवघ्या १३ महिन्यांच्या काळात ब्रेबॉर्नपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अत्यंत देखणे असे क्रिकेट मैदान बांधून दाखवले. आणि त्याच मैदानाला आपण आज वानखेडे स्टेडियम म्हणून ओळखतो.



