Waqf Amendment Bill 2025:राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री २.३० वाजता मंजूर

0
Waqf Amendment Bill 2025:राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री २.३० वाजता मंजूर
Waqf Amendment Bill 2025:राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री २.३० वाजता मंजूर

नगर : लोकसभेनंतर राज्यसभेतही (Rajyasabha) वक्फ सुधारणा विधेयकाला (Waqf Amendment Bill Rajyasabha 2025) मंजुरी मिळाली आहे.आता ते राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे.राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. राज्यसभेत या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. त्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी मध्यरात्री २ वाजून ३२ मिनिटाला राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली.

नक्की वाचा : राज्य सरकारची ‘आयुष्यमान भारत,मिशन महाराष्ट्र’ समिती स्थापन;डॉ.ओमप्रकाश शेटे अध्यक्षपदी 
राज्यसभेतील १२८ खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले,तर ९५ खासदारांनी विरोधात मत दिले. सरकारच्या मते, या विधेयकामुळे वक्फ संपत्तींच्या संरक्षणाला बळ मिळेल, तर विरोधकांनी हे विधेयक काही समुदायांवर अन्याय करणारे असल्याचा आरोप केला आहे. राज्यसभेचं कामकाज आज (४ एप्रिल) पहाटे ४ वाजेपर्यंत सुरु होतं. वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीवर राज्यसभेत चर्चा करण्यात आली.

अवश्य वाचा : विवाहिता आणि बाहुलीचं गूढ? रहस्यमय ‘जारण’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित!  

राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ (Waqf Amendment Bill 2025)

वक्फ सुधारणा विधेयकाच्या राज्यसभेतील चर्चावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला होता. या विधेयकावर राज्यसभेत सुमारे १२ तास चर्चा झाली. वक्फ सुधारणा विधेयक अन्याय करणारे असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. तर केंद्रीय गृहमंत्री यांनी राज्यसभेत आक्रमक भाषण केलं. त्यानंतर मध्यरात्री मतदान घेण्यात आलं आणि मध्यरात्री २.३० वाजता वक्फ विधेयक मंजूर झाल्याचं सभापती जगदीप धनखड यांनी सांगितले.

वक्फ सुधारणा विधेयकात अनेक त्रुटी (Waqf Amendment Bill 2025)

राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की,या विधेयकात अनेक त्रुटी आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयक अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी आणले गेले आहे, असा आरोपही मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here